तीन आठवड्यांत दुसऱ्यांदा सुरक्षा दलांना लक्ष्य
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुंछ सेक्टरमध्ये शुक्रवारी दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या वाहनावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी पूंछ जिल्ह्यातील खानेतर भागात दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनांवर हल्ला केला. यानंतर जवानांना प्रत्युत्तर द्यावे लागले. Terrorists carrying army vehicles attack in Poonch of Jammu and Kashmir
अद्याप कोणतीही दुखापत किंवा मृत्यू झाल्याचे वृत्त नाही. सध्या गोळीबार सुरू आहे. हा परिसर रिकामा करून लष्कराने शोधमोहीम राबवली आहे. दुसऱ्या बाजूला किती दहशतवादी लपले आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
वृत्तानुसार, पुंछमधील रस्त्यालगत असलेल्या टेकडीवरून लष्कराच्या वाहनावर दोन राऊंड चालवले गेले. या घटनेत लष्करातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वाहनाचे नुकसान झाले आहे.
पीर पंजाल श्रेणीतील राजौरी आणि पुंछ सेक्टर 2003 पासून दहशतवादापासून मुक्त होते, परंतु ऑक्टोबर 2021 पासून येथे पुन्हा मोठे हल्ले सुरू झाले आहेत. गेल्या सात महिन्यांत येथे अधिकारी आणि कमांडोसह 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. या भागात गेल्या दोन वर्षांत 35 हून अधिक जवान शहीद झाले आहेत.
Terrorists carrying army vehicles attack in Poonch of Jammu and Kashmir
महत्वाच्या बातम्या
- विधानसभा अध्यक्षांचा कौल शिंदेंच्या पारड्यात; अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा विरली हवेत!!
- उपराष्ट्रपतींना अयोध्येचे निमंत्रण; आधी वेळ कळवून परिवारासह घेणार श्री रामलल्लांचे दर्शन!!
- या वर्षी दहा पैकी नऊ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग नफ्यात राहण्याची चिन्हं!
- ग्रीस समलिंगी विवाह, दत्तक प्रक्रियेस कायदेशीर मान्यता देणार!