विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाकाळात मदत करण्यास परवानगी देण्यासाठी ‘अल कायदा या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी शबील अहमद याने त्याने दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. अहमद हा पेशाने डॉक्टर आहे.Terrorist wants to act as a doctor
‘अल कायदा या दहशतवादी संघटनेचे काम करीत असलेल्या शबील अहमदला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने २२ फेब्रुवारीला अटक केली. ‘अल कायदा’च्या भारतातील आणि विदेशातील अन्य सदस्यांना अर्थ व अन्य मदत पुरवीत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे
तसेच ब्रिटनमधील ग्लास्गो विमानतळावर ३० जून २००७ रोजी झालेल्या आत्मंघाती दहशतवादी हल्ल्यातील तो आरोपी आहे.वैद्यकीय व्यावसायिक म्हणून त्याचा अनुभव आणि कौशल्य याचा उपयोग तिहारमध्ये पसरलेला कोरोना आणि कोरोनाबाधित कैद्यांवरील उपचारासाठी होऊ शकेल,
असे त्याने न्यायालयात म्हटले आहे. सध्या तिहार तुरांगातही मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढला आहे. शबील हा एमबीबीएस डॉक्टर असून गंभीर आजारावर उपचार करण्याचा त्याला सात वर्षांचा अनुभव आहे.