विशेष प्रतिनिधी
श्रीनगर – जम्मू काश्मीचरमधे सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत लष्करे तय्यबाचा कट्टर कमांडर सलीम पर्रे याला ठार केले. श्रीनगरच्या शालीमार क्षेत्रात ही चकमक झाली. तेथे दहशतवादी लपले होते.
पोलिसांनी परिसराला वेढा घातला होता. यावेळी दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले होते,Terrorist killed in J and K
परंतु त्याकडे दहशतवाद्यांनी दुर्लक्ष करत गोळीबार सुरू केला. त्यावेळी सुरक्षा दलाने जोरदार कारवाई करत दहशतवाद्यांना जेरीस आणले. त्यात लष्करे तय्यबाचा कट्टर दहशतवादी सलीम पर्रे मारला गेला. जम्मूच्या अरनिया सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडून घुसखोरी करणाऱ्या एका व्यक्तीला सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने ठार केले.
यापूर्वीही शनिवारी कुपवाडाच्या केरान सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या सैनिकास भारतीय जवानांनी ठार केले होते. घुसखोराचे नाव मोहंमद शब्बीर मलीक असे असून तो पाकिस्तानचा सैनिक होता. मृत सैनिक हा बॉर्डर ॲक्शन टीम (बॅट)चा सदस्य असू शकतो, असे भारतीय अधिकाऱ्याने सांगितले.
Terrorist killed in J and K
महत्त्वाच्या बातम्या
- योगी आदित्यनाथांना मथुरेतून निवडणुकीसाठी उभे करण्याची जे. पी. नड्डांकडे मागणी, खासदाराने सांगितले भगवान श्रीकृष्णाच्या प्रेरणेने लिहिले पत्र
- बुल्लीबाई अॅप प्रकरणी बंगळुरुतील अभियंता ताब्यात, मुस्लिम महिलांची बदनामी केल्याचा आरोप
- माजी पत्नीनेच काढली लाज, म्हणाल्या हाच काय तो इम्रान खान यांचा नवा पाकिस्तान
- गोव्यात पुन्हा भाजपचीच सत्ता, आप बनणार प्रमुख विरोधी पक्ष, तृणमूल डब्यात, कॉँग्रेस गाळात