• Download App
    सुरक्षा दलाला जम्मू आणि काश्मिरमध्ये मोठे यश ; लष्करे तोयबाचा दहशतवादी ठार |Terrorist killed in J and K

    सुरक्षा दलाला जम्मू आणि काश्मिरमध्ये मोठे यश ; लष्करे तोयबाचा दहशतवादी ठार

    विशेष प्रतिनिधी

    जम्मू – जम्मू आणि काश्मिरमध्ये पूंच जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत लष्करे तोयबाचा एक दहशतवादी मारला गेला. अबू जरारा असे या दहशतवाद्याचे नाव असून तो पाकिस्तानातील आहे.Terrorist killed in J and K

    या दहशतवाद्याला पाकिस्तानात प्रशिक्षण दिले होते. त्याला राजौरी-पूंच परिसरात हल्ले घडविण्यासाठी पाठविण्यात आले होते. त्याचा खातमा केल्याने दहशतवादविरोधी मोहिमेत दलाला मोठे यश मिळाले. यावर्षी ठार झालेला हा आठवा दहशतवादी आहे.



    बेहरामगला परिसरात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर, दलाने या परिसराला वेढा घालून शोधमोहिम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी दलावर गोळीबार करत पलायन करण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात या दहशतवाद्याचा मृत्यू झाला.

    सुरक्षा दलाने घटनास्थळावरून एके ४७ रायफल, चार काडतुसे, ग्रेनेड आणि भारतीय चलन जप्त केले. स्थानिकांच्या पाठिंब्यामुळे लष्कर व पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून राजौरी-पूंच भागात अशा प्रकारची कारवाई सातत्याने केली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

    Terrorist killed in J and K

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Golden Temple : सुवर्ण मंदिरावर पुन्हा बॉम्ब हल्ल्याची धमकी; 24 तासांत आणखी एक ई-मेल

    PM Kisan : किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता या आठवड्यात येण्याची शक्यता; PM मोदी 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात करणार ट्रान्सफर

    Monsoon Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन: बिहार मतदार यादीवरून विरोधक आक्रमक; सरकारकडून 7 महत्त्वाची विधेयके सादर होणार