• Download App
    आसाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांत पाच ट्रकचालक ठार Terrorist killed five truck drivers

    आसाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांत पाच ट्रकचालक ठार

    विशेष प्रतिनिधी

    दीपू – आसाममधील दीमा हसाओ जिल्ह्यात संशयित दहशतवाद्यांनी पाच ट्रकना आग लावली. यात सर्व ट्रकचालकांचा मृत्यू झाला. Terrorist killed five truck drivers

    रंगीरबील भागात उभ्या असलेल्या पाच ट्रकवर ‘दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी’च्या संशयित दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. यात दोन ट्रकचालकांचा मृत्यू झाला. अन्य तीन चालकांचा आगीत जळून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या ट्रकमधून दिमा हसाओ जिल्ह्यातील उमरंगसू येथून होजाय जिल्ह्यातील लंका येथे कोळसा वाहून नेला जात होता.



     

    दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आसाम रायफल्सच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे. घटनास्थळी सुरक्षा वाढविण्यात आली आहे. संबंधित दहशतवाद्यांनी पैशाची मागणी केली होती, असा दावा ट्रकमालकांनी केला.

    Terrorist killed five truck drivers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Jagdeep Dhankhar उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अचानक राजीनामा; वैद्यकीय कारणास्तव पदत्याग

    Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर सरकारने म्हटले- घाईत निष्कर्ष नको; अंतिम तपास अहवालाची प्रतीक्षा करा

    CM Yogi : सीएम योगी म्हणाले- कावडियांच्या वेशात बदमाश लपलेत, त्यांचा पर्दाफाश करू