वृत्तसंस्था
जम्मू : जम्मू – काश्मीरमध्ये दोन मजुरांचे दहशत टारगेट किलिंग करणारा दहशतवादी इमरान बशीर गनी हा शोपियानमध्ये ठार झाला आहे. तो एक हायब्रीड दहशतवादी होता आणि दुस-या दहशतवाद्याच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, त्यादरम्यान दुस-या दहशतवाद्याच्या गोळीने इम्रान ठार झाला. Terrorist Imran Ghani, who carried out a target killing attack on laborers in Jammu and Kashmir, has been killed
जम्मू – काश्मीरमधील मजुरांवर ग्रेनेड फेकणारा दहशतवादी इम्रान बशीर गनी याला जिवंत पकडण्यात आले होते. त्यानंतर त्याने केलेल्या खुलाशांच्या आधारे छापेमारी करण्यात येत होती. त्यादरम्यान, शोपियानच्या नौगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली आणि इम्रान ठार झाला.
शोपियानमध्ये दोन मजुरांवर ग्रेनेडने केला होता हल्ला
जम्मू – काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात उत्तर प्रदेशातील दोन मजूर ठार झाले. दोघेही राज्यातील कन्नौज जिल्ह्यातील रहिवासी होते. काश्मीर पोलिसांनी मंगळवारी ट्वीट करत ही माहिती दिली होती.
Terrorist Imran Ghani, who carried out a target killing attack on laborers in Jammu and Kashmir, has been killed
महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात महाराष्ट्रासाठी रेल्वे विकासाचे हायस्पीड निर्णय; कोणते ते वाचा!
- दाऊद – हाफिज सईदला भारताच्या ताब्यात कधी देणार? पाकिस्तानी अधिकाऱ्याची बोलती बंद प्रतिनिधी
- पीएफआयच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा अॅडमिन पाकिस्तानी, सिमीच्या धर्तीवर काम; एटीएसच्या चौकशीत माहिती उघड
- राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर : साम्य काय??, भेद काय??