• Download App
    Terrorist पूंछमध्ये सुरक्षा दलांच्या धडाकेबाज कारवाईत

    Terrorist : पूंछमध्ये सुरक्षा दलांच्या धडाकेबाज कारवाईत दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त

    Terrorist

    सुरक्षा दलांनी पाच आयईडी आणि दोन वायरलेस सेट जप्त केले आहेत.


    विशेष प्रतिनिधी

    जम्मू-काश्मीर : Terrorist  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, सुरक्षा दलांची दहशतवादाविरुद्ध कारवाई सुरूच आहे. दरम्यान, भारतीय सैनिकांनी जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त केली. आहेत.Terrorist

    तसेच, दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणाहून जप्त केलेले पाच सुधारित स्फोटक यंत्र (आयईडी) देखील नष्ट करण्यात आले. बैसरनमधील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दल दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत आहेत.



    सोमवारी सुरक्षा दलांनी पूंछ जिल्ह्यात शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त केली. तेथून सुरक्षा दलांनी पाच आयईडी आणि दोन वायरलेस सेट जप्त केले आहेत. ही कारवाई लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एका विशेष गटाने केली.

    सुरनकोटच्या सुरनथल भागात संयुक्त कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी ५०० ग्रॅम ते ५ किलो वजनाचे आयईडी जप्त केले. यानंतर सुरक्षा दलांनी ते उद्ध्वस्त केले. सुरक्षा दलांनी मिळवलेल्या या यशामुळे सीमावर्ती जिल्ह्यात संभाव्य हल्ले रोखले गेले.

    सुरक्षा दलांनी जप्त केलेले आयईडी स्फोटकं दहशतवाद्यांनी हुशारीने लपवली होती. दहशतवाद्यांनी हे आयईडी दोन स्टीलच्या बादल्या आणि तीन टिफिन बॉक्समध्ये लपवले होते. यासोबतच घटनास्थळावरून युरियाचे पाच पॅकेट, पाच लिटरचा गॅस सिलेंडर, एक दुर्बिणी, लोकरीच्या टोप्या, ब्लँकेट आणि इतर अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या.

    इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त झाल्यामुळे, या भागात दहशतवाद्यांचा सुळसुळाट असल्याचे मानले जात आहे. सुरक्षा दलांकडून राबविल्या जाणाऱ्या या कारवाईद्वारे, परिसरातील दहशतवादी पायाभूत सुविधा पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

    Terrorist hideouts destroyed in a massive operation by security forces in Poonch

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    एअर चीफ मार्शलनंतर आता पंतप्रधान मोदींशी संरक्षण सचिवांची भेट

    NIA uncovers : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मूळ मास्टरमाइंड NIAने काढला शोधून

    नागरी संरक्षणाच्या सर्व व्यवस्था चोख करा, हल्ल्यापासून बचावाची mock drill घ्या; केंद्रीय गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना महत्वपूर्ण आदेश!!