वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांच्या हत्या केल्या. जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटविल्यानंतर तिथल्या वातावरणात कुठलाही सकारात्मक बदल झाला नाही असा संदेश सर्व जगात पसरविण्याचा प्रयत्न केला. पण त्या पलीकडे जाऊन दहशतवाद्यांनी पहलगाम मधल्या हत्याकांडाचे समर्थन करण्यासाठी वेगळाच फंडा वापरला.
पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी कुठल्याही निरपराध पर्यटकांना मारले नाही, तर भारताने पर्यटकांच्या रूपात काश्मीरमध्ये घुसवलेल्या इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मारले, असा दावा काश्मीर रेजिस्टंन्स या संघटनेने केला. 370 कलम हटविल्यानंतर भारताने काश्मीर मधली परिस्थिती सर्वसामान्य आहे असे भासवण्यासाठी इंटेलिजन्स ब्युरो आणि संस्थांचे अधिकारी आणि कर्मचारी पर्यटकांच्या रूपात तिथे पाठवायला सुरुवात केली. त्यांनी काश्मिरींचे स्वातंत्र्याचे आंदोलन दडपायचे काम केले. आम्ही पहलगाम मध्ये त्यांना धडा शिकवला. कुठल्याही निरपराध पर्यटकाची हत्या केली नाही. काश्मीरचा स्वातंत्र्यलढा असाच पुढे चालू ठेवण्याचा निर्धार यातून आम्ही केला. इथून पुढे हल्ले वाढवत राहू, अशी धमकी काश्मीर रेजिस्टन्स संघटनेने दिली.
वास्तविक पहलगाम मध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांची हत्या केली. त्यांना धर्म विचारला. त्यांना कलमा पढायला लावला. त्यांच्या पॅन्ट उतरवून ते हिंदू की मुसलमान हे तपासले आणि मग गोळ्या घातल्या. हिंदू द्वेषातून हे हत्याकांड घडवले पण प्रत्यक्षात त्या हत्याकांडाचे समर्थन करताना काश्मीर रेजिस्टन्स संघटनेने त्याला काश्मिरी स्वातंत्र्य आंदोलनाचा बुरखा पांघरला. वर हल्ले आणखी
Terrorist groups justify Pahalgam attack
महत्वाच्या बातम्या
- अज्ञात व्यक्तींनी पाकिस्तानात घुसून दहशतवादी म्होरक्यांना टिपून टिपून मारले, पण त्यावर पहेलगाम हल्ल्याने पाणी फेरले!!
- पाकिस्तानी लष्करप्रमुखाच्या हिंदू हेट स्पीच नंतरच पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; सर्जिकल आणि एअर स्ट्राइक पेक्षाही जबरदस्त तडाख्याची मोदी सरकारकडून अपेक्षा!!
- Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, अनेक पर्यटक जखमी