• Download App
    Gondia गोंदियात भीषण रस्ता अपघात, बस उलटली

    Gondia : गोंदियात भीषण रस्ता अपघात, बस उलटली आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू

    Gondia

    मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले तातडीने मदतीचे आदेश


    विशेष प्रतिनिधी

    गोंदिया : Gondia  महाराष्ट्रातील गोंदिया येथे शुक्रवारी एक भीषण रस्ता अपघात झाला. येथे बस उलटल्याने 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्तांना तातडीने १० लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश परिवहन प्रशासनाला दिले.Gondia

    गोंदिया कोहमारा राज्य महामार्गावरील खजरी गावाजवळ दुचाकी वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. ही महाराष्ट्र रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (MSRTC) बस आहे. बस पलटी झाल्याने प्रवाशांचा चिरडून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी दुपारी 12:00 ते 12:30 च्या दरम्यान घडली.



    भंडारा येथून साकोली लाखनीमार्गे गोंदियाकडे जाणाऱ्या शिवशाही बसच्या (क्रमांक एमएच ०९/ईएम १२७३) समोर अचानक दुचाकी आली. दुचाकी चालकाला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना चालकाने बस वळवल्याने भरधाव वेगात असलेली बस पलटी झाली. अपघाताच्या वेळी बसमध्ये 35 हून अधिक प्रवासी होते, त्यापैकी नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेत काही जण गंभीर जखमी झाले आहेत.

    प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बस चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. प्रवाशांकडून माहिती मिळताच रुग्णवाहिका विभाग आणि पोलीस विभागाचे लोक घटनास्थळी पोहोचले. जखमी प्रवाशांना बाहेर काढून गोंदिया जिल्हा शासकीय केटीएस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बस उचलण्यासाठी क्रेनची मदत घेतली जात आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

    Terrible road accident in Gondia, bus overturns, 9 people dead so far

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Shashi Tharoor : Video : अमेरिकेत जेव्हा शशी थरूर यांना त्यांच्याच मुलाने विचारला भर पत्रकारपरिषदेत प्रश्न, म्हटले..

    G7 च्या निमंत्रणावरून भारतात उगाच आरडाओरडा; कॅनडाचे भारताला निमंत्रण, पंतप्रधान मोदींचा होणार दौरा!!

    ऑपरेशन सिंदूरबद्दल दिशाभूल करणाऱ्या पोस्ट, गुजरात काँग्रेसच्या सरचिटणीसांना अटक