सध्या मारेकऱ्यांची ओळख पटलेली नाही, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नोएडा सेक्टर 104 चा परिसर शुक्रवारी दुपारी गोळ्यांच्या आवाजाने दणाणला होता, येथे, एका उच्चभ्रू परिसरात कारमधून जात असलेल्या एका व्यक्तीवर 5 दुचाकीस्वारांनी 9 राउंड गोळीबार करून त्याची हत्या केली. या खुनाच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले, त्यांनी त्या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. या प्रकरणी आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव सूरज भान (वय 32) असे आहे.Terrible murder in Noida five goons shot at a young man
हे संपूर्ण प्रकरण नोएडातील पोलीस स्टेशन 39 सेक्टर परिसरातील सेक्टर 104 चे आहे. दुपारी एकच्या सुमारास लोटस बुलेवर्ड सोसायटीत राहणारा सूरजभान एनीटाइम जिममधून वर्कआऊट करून आपल्या कारमध्ये परतत होता. त्यानंतर पाच दुचाकीस्वारांनी त्याच्यावर हल्ला केला.
याप्रकरणी पोलिसांनी सध्या हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. शिवाय या प्रकरणाची चौकशीही सुरू करण्यात आली आहे. सध्या मारेकऱ्यांची ओळख पटलेली नाही, त्यासाठी प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू आहे. तसेच, जवळपास बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.
Terrible murder in Noida five goons shot at a young man
महत्वाच्या बातम्या
- दावोसमध्ये 3.53 लाख कोटींचे विक्रमी गुंतवणूक करार करून मुख्यमंत्री महाराष्ट्रात परत!!
- वडोदराच्या हरणी तलावात बोट उलटल्याने २५ पेक्षा अधिक विद्यार्थी बुडाले!
- अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आलेल्या रामभक्तांना अल्पसंख्याक मोर्चा मोफत चहा देणार!
- राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी!