• Download App
    भीषण दुर्घटना! स्कूल बस उलटली सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी|Terrible accident School bus overturns six students killed many seriously injured

    भीषण दुर्घटना! स्कूल बस उलटली सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

    जाणून घ्या कुठं घडला आहे हा भीषण अपघात


    विशेष प्रतिनिधी

    हरियाणातील नारनौलमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस उलटल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात 6 मुलांचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली असून, 12 मुले गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना नारनौलमधील केनिना गावाजवळ घडली.Terrible accident School bus overturns six students killed many seriously injured



    जीएल पब्लिक स्कूलची बस उलटल्याने अनेक मुले गंभीर जखमी झाली. विशेष म्हणजे ईदच्या शासकीय सुट्टीतही शाळा सुरू होत्या, हा मोठा प्रश्न आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसचे फिटनेस सर्टिफिकेटही कालबाह्य झाले असून फिटनेस प्रमाणपत्राशिवाय बसमधून मुलांची वाहतूक सुरू होती.

    अशीच एक घटना 2 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील देवा पोलीस स्टेशन हद्दीतील सालारपूर गावाजवळ घडली होती. लखनऊमध्ये पिकनिकनंतर परतणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस उलटल्याने तीन मुले आणि एका कंडक्टरसह चार जणांचा मृत्यू झाला, तर ३२ मुले जखमी झाली होती. अपघाताच्या वेळी स्कूल बसचा वेग खूप होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. 12 ते 13 वर्षे वयोगटातील तीन मुले आणि बस कंडक्टरचाही मृत्यू झाला असून 32 मुले गंभीर जखमी आहेत.

    Terrible accident School bus overturns six students killed many seriously injured

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Assam Govt : आसाममध्ये 40 लाख महिलांच्या खात्यात ₹9000 हस्तांतरित; 4 महिन्यांचे पैसे एकाच वेळी पाठवले, मुख्यमंत्र्यांनी सांगितले- निवडणुकीशी याचा काहीही संबंध नाही

    CBSE Class : CBSEच्या 12वीच्या पेपरवर गाण्याचा क्यूआर कोड; स्कॅन केल्यावर यू-ट्यूब लिंक उघडत आहे, CBSE ने म्हटले- चूक झाली, पण पेपर सुरक्षित

    Chandigarh Firm : अण्वस्त्र आणीबाणीच्या तयारीत खाडीतील देश; चंदीगडमधील औषध कंपनीकडे अणुआपत्तीत उपयुक्त ठरणाऱ्या 1 कोटी कॅप्सूलबाबत विचारणा