• Download App
    यमुना 'एक्स्प्रेस वे'वर भीषण अपघात, दोन बसच्या धडकेत ४० प्रवासी जखमी!|Terrible accident on Yamuna Expressway 40 passengers injured in collision of two buses

    यमुना ‘एक्स्प्रेस वे’वर भीषण अपघात, दोन बसच्या धडकेत ४० प्रवासी जखमी!

    जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचा यमुना एक्सप्रेस वे गेल्या अनेक दिवसांपासून अपघातांच्या चर्चेत आहे. सोमवारी येथे पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. यमुना एक्स्प्रेस वेवर पहाटे तीनच्या सुमारास दोन बसमध्ये भीषण टक्कर झाली. या अपघातात एकूण ४० प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.Terrible accident on Yamuna Expressway 40 passengers injured in collision of two buses



    आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, यमुना एक्स्प्रेस वेवर मथुराजवळील माईल स्टोन ११० राया कट येथे पहाटे तीन वाजता दोन बस एकमेकांवर आदळल्या. या अपघातात ४० जण जखमी झाले असून त्यापैकी ३१ जखमींना जिल्हा रुग्णालयात तर ९ जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    पोलिसांनी जबाब दिला

    यमुना एक्स्प्रेस वेवर झालेल्या या भीषण अपघातावर पोलिसांचे म्हणणेही समोर आले आहे. मथुराचे एसएसपी शैलेश पांडे यांनी सांगितले की, अपघातामधील एक बस धौलपूरहून नोएडाला जात होती आणि दुसरी बस इटावाहून नोएडाला जात होती. दरम्यान यमुना द्रुतगती मार्गावर या दोन्ही बसचा अपघात झाला.

    Terrible accident on Yamuna Expressway 40 passengers injured in collision of two buses

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार