• Download App
    उत्तराखंडमध्ये भीषण दुर्घटना, भूस्खलनामुळे बोगद्यात ४० मजूर अडकले, SDRF टीम दाखल! Terrible accident in Uttarakhand 40 laborers trapped in tunnel due to landslide SDRF team entered

    उत्तराखंडमध्ये भीषण दुर्घटना, भूस्खलनामुळे बोगद्यात ४० मजूर अडकले, SDRF टीम दाखल!

    बोगद्यातून कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू .

    विशेष प्रतिनिधी

    उत्तराखंड : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील बोगद्यात ४० मजूर अडकले आहेत. बोगद्यात भूस्खलनामुळे हा प्रकार घडला. यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर रस्ते बांधणीचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत सिल्क्यरा ते दंडलगाव असा बोगदाही बांधण्यात येत आहे. Terrible accident in Uttarakhand 40 laborers trapped in tunnel due to landslide SDRF team entered

    दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. बोगद्यातून कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एनएचआयडीसीएलच्या निर्देशानुसार नवयुग कंपनीमार्फत हा बोगदा बांधण्यात येत आहे.

    बोगद्यात ४० हून अधिक मजूर अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन उत्तरकाशीने याला दुजोरा दिला आहे. बोगद्यात एकूण किती कामगार अडकले आहेत याची निश्चित माहिती अद्याप मिळालेली नाही. कंपनीकडून मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. दुर्घटनास्थळी पाच रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.

    Terrible accident in Uttarakhand 40 laborers trapped in tunnel due to landslide SDRF team entered

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    TMC Split Update : ममता गटाने म्हटले- TMC वरील बंडखोर गटाचा दावा खोटा; निवडणूक आयोगाला सांगितले- पक्षघटनेनुसार सर्व समित्या 2027 पर्यंत वैध

     Manipur News : मणिपूरच्या उखरूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात 2 जवान शहीद; 40 आसाम रायफल्सच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू

    प्रियांका गांधींचा मतदारसंघ वायनाडमध्ये पुन्हा एकदा भूस्खलन; प्रियांका गांधींचे दिल्लीतून ट्विट!!