बोगद्यातून कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू .
विशेष प्रतिनिधी
उत्तराखंड : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील बोगद्यात ४० मजूर अडकले आहेत. बोगद्यात भूस्खलनामुळे हा प्रकार घडला. यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर रस्ते बांधणीचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत सिल्क्यरा ते दंडलगाव असा बोगदाही बांधण्यात येत आहे. Terrible accident in Uttarakhand 40 laborers trapped in tunnel due to landslide SDRF team entered
दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. बोगद्यातून कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एनएचआयडीसीएलच्या निर्देशानुसार नवयुग कंपनीमार्फत हा बोगदा बांधण्यात येत आहे.
बोगद्यात ४० हून अधिक मजूर अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन उत्तरकाशीने याला दुजोरा दिला आहे. बोगद्यात एकूण किती कामगार अडकले आहेत याची निश्चित माहिती अद्याप मिळालेली नाही. कंपनीकडून मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. दुर्घटनास्थळी पाच रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.
Terrible accident in Uttarakhand 40 laborers trapped in tunnel due to landslide SDRF team entered
महत्वाच्या बातम्या
- Land For Job Scam: लालू-तेजस्वी यांच्या निकटवर्तीयावर ईडीचा फास, अमित कात्याल यांना अटक
- फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्रायलला युद्धबंदीचा केला आग्रह!
- वंदे भारत स्पेशल’ ट्रेन आजपासून नवी दिल्ली ते पाटणा या मार्गावर धावणार!
- … तर विमान लँड झालेच नसते; नाथाभाऊंचा मुख्यमंत्र्यांना इमोशनल फोन!!