• Download App
    मध्य प्रदेशात भीषण दुर्घटना, प्रवाशांनी भरलेली बस पेटली १२ जणांचा मृत्यू|Terrible accident in Madhya Pradesh bus full of passengers caught fire 12 people died

    मध्य प्रदेशात भीषण दुर्घटना, प्रवाशांनी भरलेली बस पेटली १२ जणांचा मृत्यू

    मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे.


    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ : मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी प्रवाशांनी भरलेल्या बसने अपघात झाल्यानंतर पेट घेतला. या आगीत अनेक जण जिवंत जळाले आता या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. दुहई मंदिराजवळ हा अपघात झाला. या घटनेवर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे.Terrible accident in Madhya Pradesh bus full of passengers caught fire 12 people died



    वृत्तसंस्था पीटीआयने जिल्हा रुग्णालय गुनाचे सीएचएमओ डॉ. एस. भोला यांच्या हवाल्याने सांगितले की, अपघातस्थळावरून लोकांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. बाकीच्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

    बस एका डंपरला धडकली, त्यानंतर बसला आग लागली आणि प्रवासी पेटू लागल्याचे सांगण्यात आले आहे. बस गुनाहून आरोनला जात होती. या आगीत १५ जण भाजले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.

    Terrible accident in Madhya Pradesh bus full of passengers caught fire 12 people died

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक दिवस; आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते मेट्रोचे उद्घाटन!!

    Toxic Cough Syrup : 2 राज्यांत कफ सिरपमुळे 23 मुलांचा मृत्यू; 5 राज्यांमध्ये कोल्ड्रिफ सिरपवर बंदी, सीबीआय चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

    Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत टाइप-7 बंगला अलॉट; नवा पत्ता- 95 लोधी इस्टेट; खासदाराच्या घरी राहत होते