• Download App
    दिल्ली विमानतळावर भीषण दुर्घटना ; छत कोसळल्याने सहा जण जखमी! Terrible accident at Delhi airport Six people were injured due to the collapse of the roof

    दिल्ली विमानतळावर भीषण दुर्घटना ; छत कोसळल्याने सहा जण जखमी!

    वाहनांचेही झाले मोठे नुकसान Terrible accident at Delhi airport Six people were injured due to the collapse of the roof

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-1 वर छत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी टर्मिनल १ वर विमानतळाचे छत एका वाहनावर पडले. या अपघातात 6 जण जखमी झाले आहेत. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि बचावकार्य सुरू केले. दिल्ली अग्निशमन सेवेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वांना वाचवण्यात आले आणि रुग्णालयात नेण्यात आले.

    दिल्ली फायर सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-1 वर छत कोसळले. अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेत सुरुवातीस चार जण जखमी झाल्याचे वृत्त होते, मात्र. आता जखमींची संख्या सहा झाली आहे.

    अग्निशमन सेवेकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-1 चे छत कोसळल्याचा फोन शुक्रवारी पहाटे 5.30 वाजता त्यांना आला. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आतापर्यंत तीन जखमींना रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र एक जण अडकला होता. त्याचीही आता सुटका करण्यात आली आहे.

    Terrible accident at Delhi airport Six people were injured due to the collapse of the roof

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    GST Registration : GST नोंदणी 3 दिवसांत उपलब्ध होईल:; मासिक कर उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असलेल्यांना फायदा; ऑक्टोबरमध्ये ₹1.96 लाख कोटी GST कलेक्शन

    Nitish Kumar : महिलांना दिलेले 10 हजार सरकार कधीही परत घेणार नाही; नितीश कुमार म्हणाले- 1.5 कोटी महिलांना पैसे दिले, जोपर्यंत महिला येतील तोपर्यंत पैसे देत राहू

    West Bengal : पश्चिम बंगालमध्ये SIR प्रशिक्षणाला विरोध; BLO म्हणाले- प्रशासकीय आणि सुरक्षा व्यवस्था चांगली नाही