आफ्रिकन देश माली येथे ही भीषण दुर्घटना घडली आहे. Terrible accident 31 people died when an uncontrolled bus fell from a bridge
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: आफ्रिकन देश माली येथे मंगळवारी संध्याकाळी झालेल्या एका रस्ते अपघातात 31 जणांचा मृत्यू झाला. प्रवाशांनी भरलेली बसचे नियंत्रण सुटून पुलावरून खाली पडल्याने हा अपघात झाला. या अपघातात 31 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत.
पश्चिमेकडील केनिबा शहराजवळ सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला. मालीच्या परिवहन मंत्रालयाने फेसबुकवर एक निवेदन जारी करून अपघाताची माहिती दिली आहे.
रस्ते अपघात केवळ मालीमध्येच नाही तर आफ्रिकेतही होतात. कारण आफ्रिका खंडातील रस्त्यांची स्थिती चांगली नाही. तुटलेल्या आणि खराब रस्त्यांवरून वेगाने जाणारी वाहने अनेकदा अशा अपघातांना बळी पडतात. देशातील प्रमुख रस्ते आणि महामार्गांची अवस्थाही अशीच आहे.
Terrible accident 31 people died when an uncontrolled bus fell from a bridge
महत्वाच्या बातम्या
- मुंबईत कुर्ला येथे प्रकल्पबाधितांना 961 घरांचे मुखमंत्र्यांच्या हस्ते वाटप!!
- CAA मार्चमध्ये लागू होणार? ; लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा घेणार निर्णय!
- EDने केजरीवालांना पाठवले आठवे समन्स, ‘या’ दिवशी चौकशीसाठी बोलावले
- शिवराळ भाषा जरांगेंची, पण पवारांचा फडणवीसांवरच असभ्यतेचा आरोप; अप्रत्यक्षपणे घेतली जरांगेंची बाजू!