• Download App
    खोटी धार्मिक ओळख सांगणाऱ्या बांगड्या विक्रेत्यावर मध्यप्रदेशात हल्ला|Tension grips in MP due to some sensitive issue

    खोटी धार्मिक ओळख सांगणाऱ्या बांगड्या विक्रेत्यावर मध्यप्रदेशात हल्ला

    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ – मध्यप्रदेशातील इंदूर शहरामध्ये बांगड्या विकणाऱ्या एका व्यक्तीला जमावाने मारहाण केल्याचा प्रकार उघड झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.जमावाने तस्लिमला मारहाण केल्यानंतर त्याच्याकडील मोबाईल आणि दहा हजार रुपयांची रक्कम हिसकावून घेतली.Tension grips in MP due to some sensitive issue

    सध्या स्थानिक पोलिस हल्लेखोरांचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत. या घटनेनंतर विक्रेत्याच्या समर्थकांनी पोलिस ठाणे गाठत तिथेच गोंधळ घातल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.याबाबत गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, की संबंधित व्यक्तीने स्वतःची खोटी धार्मिक ओळख सांगून बांगड्या विकल्याने ही घटना घडली.



    या घटनेचे व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाले आहे. इंदूर शहरात गोविंद नगर भागात रविवारी ही घटना घडली. पोलिसांनी हल्लेखोर जमावावर दोन गटांमध्ये शत्रुत्व निर्माण केल्याचा ठपका ठेवत गुन्हे दाखल केले आहेत.

    या व्हिडिओमध्ये माथेफिरू जमाव हा तस्लिम अली या विक्रेत्याला निर्दयपणे मारहाण करत असून तो मात्र दयेसाठी आर्जव करत असल्याचे दिसून येते. अन्य एका व्हिडिओमध्ये संबंधित विक्रेत्यावर छेडछाडीचा आरोप करून त्याला निर्दयपणे मारहाण केली जात असल्याचे दिसून येते. अन्य व्यक्तींना देखील ही व्यक्ती मारहाण करण्याची चिथावणी देत असल्याचे दिसते.

    Tension grips in MP due to some sensitive issue

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार