• Download App
    आसाम आणि मिझोराम सीमेवरील परिस्थिती अजूनही तणावपूर्ण। Tension at Asam - Mizo border

    आसाम आणि मिझोराम सीमेवरील परिस्थिती अजूनही तणावपूर्ण

    विशेष प्रतिनिधी

    गुवाहाटी : आसाम आणि मिझोराम सीमेवरील परिस्थिती अद्यापही तणावपूर्ण आहे. सीमेवरील काही गावांमध्ये नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. या सीमेवरील हिंसाचारात पाच पोलिस आणि एका सामान्य नागरिक मृत्युमुखी पडले. सीमेवरील परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात असल्याचे मुख्यमंत्री सरमा यांनी सांगितले. Tension at Asam – Mizo border

    सीमेवरील काबूगंग आणि धोलाई गावातील लोकांनी मिझोरामकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर आज रास्ता रोको आंदोलन केले. मिझोरामची आर्थिक नाकाबंदी करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. सीमेवरील संघर्षात दोन्हीकडे तैनात असलेल्या ‘सीआरपीएफ’च्या जवानांनी योग्य हस्तक्षेप न केल्याची टीका होत असली तरी या जवानांमुळेच परिस्थिती नियंत्रणात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.



    सीमेवरील हिंसाचारात पोलिसांचा मृत्यू झाल्याबद्दल मिझोराम सरकारने आसाम सरकारची माफी मागायला हवी, अशी मागणी आसाममधील भाजपचे खासदार दिलीप सैकिया यांनी केली आहे. पोलिसांच्या मृत्यूचा आनंद मिझोरामचे नागरिक व्यक्त करत होते, हा राक्षसी प्रकार आहे, अशी टीकाही सैकिया यांनी केली.

    Tension at Asam – Mizo border

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!