विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : आसाम- मिझोराम सीमेवर सध्या तणावपूर्ण शांतता असून आसामच्या बराक खोऱ्यातील बंदमुळे मिझोराममधील आर्थिक व्यवहारांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी आसाम आणि मिझोराम पोलिसांचे मुख्य सचिव आणि महासंचालकांची दिल्लीत बैठक होणार असून नुकत्याच झालेल्या हिंसाचारामध्ये कचरचे पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर हे जखमी झाले होते, आता त्यांच्या जागी रमणदीप कौर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Tense situation on asam – mizo border
सध्या दोन्ही राज्यांनी सीमावर्ती भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात केला असून सोमवारी झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही राज्यांनी त्यांच्या पोलिसांना किमान शंभर मीटरपर्यंत माघारी घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ताज्या संघर्षात सातजणांचा मृत्यू झाला होता यात सहा पोलिस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होता. या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आसामच्या बराक खोऱ्यातील तीन जिल्ह्यांमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला. कचर, हेलाकांडी आणि करीमगंज या तीन जिल्ह्यांमध्ये जीवनावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. ईशान्य रेल्वेची वाहतूक मात्र विनाव्यत्यय सुरू होती.
Tense situation on asam – mizo border
महत्त्वाच्या बातम्या
- बड्या घरचे श्वान शोधण्यासाठी पोलीस आणि महापालिकेची यंत्रणा लागली कामाला, पाकिस्तानातील गुजराणवाला येथील प्रकार
- बालकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी केंद्राने संसदेने मंजूर केले बाल न्याय सुधारणा विधेयक
- जगभर ढोल वाजवलेले कोरोनाविरुद्धचे केरळ मॉडेल अपयशी ठरतंय..? आकडेवारी तरी तसेच सांगतेय…
- छत्तीसगडचे आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्री आमने-सामने, मुख्यमंत्रीपदाबाबत बदलाच्या चर्चेनंतर कॉँग्रेस आमदाराकडूनच आरोग्य मंत्र्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप