विशेष प्रतिनिधी
बंगळूर – कोविड-१९ निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार रविवारपासून राज्यातील सर्व मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वारा आदी धार्मिक स्थळे खुली करण्यात येतील. करमणूक पार्क व तत्सम जागा पुन्हा सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.Temples opens in Karnataka
सरकारच्या आदेशानुसार कोविड-१९ ची मार्गसूची आणि आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून मनोरंजन पार्क, खेळाची केंद्रे आणि तत्सम ठिकाणे पुन्हा खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तथापि, जलक्रीडा आणि पाण्याशी संबंधित साहसी क्रीडांना परवानगी नाही.
उपासना स्थळे (मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वारा आणि इतर धार्मिक स्थळे) उघडण्याची परवानगी आहे आणि उपासना स्थळांशी संबंधित कार्यक्रमांना २५ जुलैपासून परवानगी आहे. सण, मिरवणुका आणि मेळावे यांना परवानगी नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले.
Temples opens in Karnataka
महत्त्वाच्या बातम्या
- चीनची लसदेखील प्रभावी नसल्याचा दावा, जनतेच्या आरोग्याबाबत प्रश्ननचिन्ह
- उत्तर कोरियाच्या नागरिकांना अन्नधान्याची मोठी टंचाई, अमेरिकेपुढे झुकण्यास किम जोंग उन यांचा नकार
- अरुणाचलच्या सीमेवर जिनपिंग यांची भेट, भारत-चीन सीमेवरील गावाला भेट देणारे पहिलेच चिनी अध्यक्ष
- आता चक्क इंपोर्टेड बस बोटीतून झेलम नदीत जलपर्यटन, पर्यटकांना सुखद धक्का