विशेष प्रतिनिधी
मुंबई : एरवी जेष्ठांच्या पावलावर कनिष्ठ पावले टाकून मार्गक्रमणा करतात. पण आज मुंबईत उलटी गंगा वाहिली. कनिष्ठांच्या पावलावर पाऊल टाकून ज्येष्ठांनी मार्गक्रमणा केली. राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांच्या पावलावर पाऊल टाकत शरद पवारांनी निवडणुकीपूर्वी टेम्पल रन सुरू केला. Sharad pawar temple run like rahul Gandhi and mamata banerji
लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींनी “टेम्पल रन”चा प्रयोग केला होता. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी देखील “टेम्पल रन”चा प्रयोग करून “सॉफ्ट” हिंदुत्वाची लाईन पकडली होती. या दोन्ही नेत्यांना विशिष्ट मर्यादेत यश मिळाले. त्यामुळे तीच लाईन पुढे खेचत शरद पवारांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज “टेम्पल रन” केला. यासाठी त्यांनी आज जावयाला आणि नातीला बरोबर घेतले.
एरवी शरद पवार स्वतःच्या पुरोगामी प्रतिमेला जपत असतात. त्यांच्या तोंडी नेहमी महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे, अशी भाषा असते. इतकेच नाहीतर मध्यंतरी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला हाणताना मी पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातो, पण फारसा गाजावाजा करत नाही असे वक्तव्य केले होते. महाविकास आघाडीचे सरकार असताना पवार पुण्यातल्या भिडेवाडा परिसराची पाहणी करायला गेले असताना ते दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनाला जाणार असा मोठा गाजावाजा झाला होता. परंतु पवार दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या दरवाज्यापर्यंत पोहोचले. पण ते आत मध्ये गेले नाहीत. आपण मांसाहार केल्याने मंदिरात जाऊन दर्शन घेतले नाही, असे नंतर पवारांनी पत्रकारांना सांगितले होते.
मध्यंतरी अजित पवार देखील आपल्या सगळ्या आमदारांसह गुलाबी जॅकेट घालून सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले होते अजितदादा देखील देव देव करणाऱ्या नेत्यांपैकी नाहीत. पण महायुतीमध्ये आल्यानंतर त्यांना आमचा गुण लागला ते सिद्धिविनायक अशा दर्शनाला गेले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
त्या पलीकडे जाऊन आज शरद पवार यांनी राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी या ज्युनिअर नेत्यांच्या पावलावर पाऊल टाकून “टेम्पल रन” केला. ते जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे यांना घेऊन लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले. त्यांनी चिंचपोकळी राजाचेही देखील दर्शन घेतले. निवडणूक वर्षांत कुठलीही “रिस्क” घ्यायची नाही. मग अगदी आपण जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या “पुरोगामी” प्रतिमेला थोडा धक्का लागला तरी असा विचार करून पवार श्री गणेशाच्या चरणी लीन झाले. पण नेमके आजच अमित शाह देखील या गणेशांच्या दर्शनाला पोहोचले. त्यामुळे श्री गणेश नेमका कोणाला पावणार याची उत्सुकता आता महाराष्ट्राला लागून राहिली आहे.
Sharad pawar temple run like rahul Gandhi and mamata banerji
महत्वाच्या बातम्या
- Congress : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अन् ‘आप’चं अखेर जुळलं!
- Manoj jarange + Sambhji Raje : जरांगे + संभाजीराजे : चर्चा तिसऱ्या आघाडीची; पण निवडणुकीनंतरच्या समीकरणात सत्ता भरती कुणाची??
- Sharad Pawar : गुरुने दिला छुपा हा वसा; जरांगेंच्या तोंडी फक्त पाडण्याची भाषा!!
- Dalpati Vijay : दलपती विजय तमिळनाडूत 2026च्या निवडणुकीच्या लढाईत उतरण्यास तयार