विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : प्रशासकीय अधिकारी राजकारण्यांपुढे झुकण्याची अनेक उदाहरणे समोर येतात. परंतु, तेलंगणाच्या सिद्दीपेटच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पी व्यंकटरामी रेड्डी यांनी तर सर्वांवर कडी केली. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या पाया पडल्याने ते चर्चेत आले होते. मात्र, आता त्यामागचे कारण उघड झाले आहे. रेड्डी यांना राजकारण प्रवेशाचे वेध लागले आहेत.Telangana District Collector has entered politics
प्रशासकीय अधिकारी असलेल्या रेड्डी यांच्या सेवेचा एका वर्षांचा कालावधी अद्याप बाकी होता. मात्र, राजकारणाच्या क्षेत्रात उतरण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पत्रकारांशी बोलताना रेड्डी म्हणाले, आयएएस अधिकारी म्हणून काम करताना मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात राहण्याचा योग आला. त्यामुळे राज्यासाठी मुख्यमंत्र्यांची दूरदृष्टी पाहायला मिळाली.
व्यंकटरामी रेड्डी तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाच्या तिकीटावर राज्यात आगामी विधान परिषद निवडणुकीत सहभागी होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
रेड्डी यांनी १९९६ साली ग्रुप १ अधिकारी म्हणून उप-जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. २००७ साली त्यांना बढती मिळाली. गेल्या काही वर्षांत त्यांनी संयुक्त जिल्हाधिकारी तसेच जिल्हाधिकारी पदाची जबाबदारीही हाताळली.
Telangana District Collector has entered politics
महत्त्वाच्या बातम्या
- आता ‘ या ‘ जिल्ह्यात २० नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू
- Mumbai Cruise Drugs Case : गोसावी आणि खबऱ्याची चॅट उघड, मुंबई पोलीस एसआरकेची मॅनेजर पूजा ददलानी बजावणार तिसरी नोटीस
- पूर्वांचल एक्सप्रेस वे वर झालेल्या विमानांच्या गर्जना काय सांगताहेत…??; वाचा पंतप्रधानांच्या भाषणातून…!!
- मोठी बातमी : उद्यापासून करतारपूर कॉरिडॉर पुन्हा उघडणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली घोषणा