• Download App
    सीनियर विद्यार्थी मोहम्मद अली सैफच्या रॅगिंगला वैतागून तेलंगणात दलित डॉक्टर विद्यार्थिनीची आत्महत्या; राज्यात विद्यार्थ्यांचा संताप telanagana hyderabad medical student suicide case mohammad saif

    सीनियर विद्यार्थी मोहम्मद अली सैफच्या रॅगिंगला वैतागून तेलंगणात दलित डॉक्टर विद्यार्थिनीची आत्महत्या; राज्यात विद्यार्थ्यांचा संताप

    वृत्तसंस्था

    हैदराबाद : तेलंगणात वैद्यकीय शाखेचा सीनियर विद्यार्थी मोहम्मद अली सैफ याने चालविलेल्या रॅगिंगला वैतागून दलित डॉक्टर विद्यार्थिनी प्रीती अखेर आत्महत्येचा मार्ग पत्करला. 26 वर्षीय प्रीतीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याबद्दल मोहम्मद अली सैफ याला तेलंगण पोलिसांनी अटक केली आहे. telanagana hyderabad medical student suicide case mohammad saif

    डॉ. प्रीती ही तेलंगणा मधील काकतिया विद्यापीठात PG पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती. मोहम्मद अली सैफ हा तिचा सीनियर आहे. डॉ. प्रीतीने 4 दिवसांपूर्वी मोहम्मद सैफच्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिचा रविवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. तिने विषारी इंजेक्शन घेतले होते. प्रीतीला हैदराबादेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण काल 26 फेब्रुवारी रोजी तिने अखेरचा श्वास घेतला.

    प्रीतीचे वडील नरेंद्र यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार तसेच पोलीस तपासांती प्रीतीच्या कॉलेजात पोस्ट ग्रॅज्युएशनच्या द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या मोहम्मद अली सैफला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर रॅगिंग, आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे आणि SC/ST कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    प्रीतीने काकती या विद्यापीठातील रुग्णालयाकडे रुग्णालयातील प्रशासनाकडे मोहम्मद अली सैफ याच्याविरुद्ध अनेकदा तक्रारी केल्या होत्या. परंतु, प्रशासनाने त्यावर कारवाई केली नाही, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. प्रीतीने दोन्ही ठिकाणी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली होती. पण त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

    वारंगलचे पोलिस आयुक्त ए. व्ही रंगनाथ यांनी सांगितले की, वारंगलच्या काकतिया मेडिकल कॉलेजमधील पोस्ट ग्रॅज्युएशनच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी प्रीती 22 फेब्रुवारी रोजी MGM रुग्णालयात नाईट शिफ्ट करत होती. तिथेच तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिला शेवटच्यावेळी इमर्जन्सी वॉर्डमध्ये पाहण्यात आले होते. तिथे ती ड्यूटीवर होती.

    त्यानंतर ती तिच्या खोलीतून बाहेर पडताना दिसली. त्यावेळी तिने काही डॉक्टरांना डोके आणि पोट दुखत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ती बेशुद्धावस्थेत आढळली. तिला गंभीर स्थितीत हैदराबादेत शिफ्ट करण्यात आले. दोघांच्या व्हॉट्सएप चॅटवरून आरोपी मोहम्मद अली सैफ हा प्रीतीची रॅगिंग करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. टॉक्सिकोलॉजी रिपोर्टच्या आधारावर पुढील कारवाई केली जाईल, असे आश्वासन आयुक्त रंगनाथन यांनी दिले.

    कुटुंबाचा मृतदेह स्वीकारण्यास नकार

    प्रीतीच्या मृत्यूनंतर लंबाडा ट्रायबल यूनियनने हैदराबादच्या NIMS रुग्णालय, काकतिया
    मेडिकल कॉलेज आणि वारंगलच्या MGM रुग्णालयाबाहेर निदर्शने केली. प्रीतीच्या कुटुंबानेही NIMS रुग्णालयाला प्रीतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यास नकार दिला आहे.

    – प्रीतीच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई

    राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासह SC/ST राष्ट्रीय आयोगाने या प्रकरणाची दखल घेत सरकार, एमजीएम रुग्णालयाच्या सुपरिटेंडेंट, डिपार्टमेंट ऑफ एनेस्थीसियोलॉजीचे प्रमुख आणि कॉलेजच्या प्राचार्यांना नोटीस पाठवली आहे. राज्यपाल तमिलीसाई सौंदराराजन यांनी रुग्णालयात डॉ. प्रीतीची भेट घेतली. त्यांनी प्रीतीच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची घोषणा केली आहे.

    telanagana hyderabad medical student suicide case mohammad saif

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र