• Download App
    सेलिब्रिटी लग्नात आणखी एक भर; लालूपुत्र तेजस्वी यादव एअर होस्टेस एलेक्सिस रसेलशी रेशीम बंधनात!! |Tejswi yadav weds with air hostess allexsis in delhi, celebration in bihar

    सेलिब्रिटी लग्नात आणखी एक भर; लालूपुत्र तेजस्वी यादव एअर होस्टेस एलेक्सिस रसेलशी रेशीम बंधनात!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : महाराष्ट्रात “पाटलांची लेक ठाकरेंची सून” होणार ही बातमी गाजत असतानाच मग इकडे नवी दिल्लीत आणखी एक हाय प्रोफाईल सेलिब्रिटीही लग्न झाले आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी आपली लग्नगाठ एअर होस्टेस अलेक्सिस रसेल हिच्याशी बांधली आहे.Tejswi yadav weds with air hostess allexsis in delhi, celebration in bihar

    लालूप्रसाद यांची कन्या मिसा भारती हिच्या फार्महाऊसवर तेजस्वी आणि अलेक्सिस हिचा हिंदू पारंपारिक पद्धतीने विवाह झाला. अलेक्सिस रसेल ही ख्रिश्चन आहे. तिचे वडील दिल्लीतील एका शाळेचे प्राचार्य होते. तेजस्वी आणि अलेक्सिस हे गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. पण त्यांचे लगावला बर्‍याच काळ गुप्त ठेवण्यात आले ्होते.



    परंतु तेजस्वी यादव यांनी आपल्या कृतीतून खऱ्या अर्थाने समाज परिवर्तनाचा संदेश दिला आहे, असे बिहारचे राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगद आनंद सिंग यांनी सांगितले. तिकडे तेजस्वी यादव यांचा विवाह झाला आणि इकडे पाटण्यात राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यालयात मोठा उत्सव साजरा झाला मिठाई वाटण्यात आली.

    बिहार मध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या प्रत्येक कार्यालयामध्ये उत्सवी वातावरण झाले. अलेक्सिस रसेल ख्रिश्चन असल्यामुळे लालूप्रसाद यादव यांचा विवाहाला विरोध होता, असे सांगण्यात येत होते. परंतु तेजस्वी यादव यांनी आपल्या मातापित्यांच्या आशीर्वादानेच हा विवाह केल्याचे जगद आनंद सिंग यांनी स्पष्ट केले.

    Tejswi yadav weds with air hostess allexsis in delhi, celebration in bihar

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची