नवी दिल्ली – ‘फॅब इंडिया’ या बहुराष्ट्रीय कंपनीने ऐन सणासुदीच्या तोंडावर सुरू केलेल्या प्रचार मोहिमेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. या कंपनीने ‘जश्नज-ए-रिवाज’ नावाने प्रचार मोहीम सुरू केली होती. या नावालाच अनेकांनी आक्षेप घेतला आहे.Tejaswi Surya targets Fab India
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी याबाबत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘‘ दिवाळीचा उत्सव हा जश्नष-ए-रिवाज असू शकत नाही.’’यावर फॅब इंडियानेही प्रतिक्रिया व्यक्त करणारे ट्विट केले होते पण नंतर ते डिलीट करण्यात आले.
आज ट्विटवर देखील #BoycottFabIndia हा ट्रेंड चर्चेत होता. ही नवी प्रचार मोहीम सुरू करताना कंपनीने म्हटले ‘व्होग’ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, ‘‘ प्रेम आणि प्रकाशाच्या उत्सवाचे आपण सगळेच जसे स्वागत करतो
त्याचप्रमाणे फॅब इंडियाचा जश्नर-ए-रिवाजचा संग्रह भारतीय संस्कृतीच्या सौंदर्याला नमन करतो. हा एक असा संग्रह आहे जो देशाचा रंग, वातावरण आणि व्यक्तित्वाला आपल्या कवेत घेतो.’’
Tejaswi Surya targets Fab India
महत्त्वाच्या बातम्या
- शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत मेघालयच्या राज्यपालांचा केंद्राला घरचा आहेर
- ईडीची पुढील कारवाई अशोक चव्हाण यांच्यावर, चंद्रकांत पाटील यांचे संकेत
- दिवाळी सण जश्न-ए-रिवाज नाही,तेजस्वी सूर्या यांनी सूनवल्यावर फब इंडियाने मागे घेतली जाहिरात
- घोडेस्वारीच्या स्पर्धा जिंकता जिंकता त्याने जिंकले बिल गेट्सच्या मुलीचे प्रेम
- अयोध्येतील राम मंदिरातही कोणार्क सूर्य मंदिराप्रमाणे चमत्कार