विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रीय पातळीवरची प्रवेश परीक्षा NEET मधल्या पेपर फुटीशी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव कनेक्शन, पण राहुल गांधींसह सर्व विरोधकांचे मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर खापर!!, असला प्रकार आता देशाच्या राजकारणात सुरू आहे. Tejashwi Yadav connection with NEET paper leak
NEET पेपर फुटीच्या आरोपींच्या बचावात तेजस्वी यादव उतरले होते. त्यांच्या पीए ने पेपर फुटीच्या मुख्य आरोपींच्या अकॉमोडेशनची व्यवस्था केली, पण दुसरीकडे राहुल गांधींनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान साधले.
NEET चे पेपर फुटले त्यामुळे सरकारला संपूर्ण परीक्षा रद्द करावी लागली. देशभर विद्यार्थ्यांमध्ये संताप उसळला. अस्वस्थतेची भावना तयार झाली. नव्यानेच तिसऱ्यांदा सत्तारूढ झालेले मोदी सरकार राजकीय दृष्ट्या अडचणीत सापडले पण त्याचवेळी बिहार मधल्या NEET पेपर फुटीची वेगळीच बातमी समोर आली.
NEET पेपर फुटी संदर्भात अटक केलेला आरोपी आणि मास्टर माईंड सिकंदर कुमार यादव याला नॅशनल हायवे गेस्ट हाऊस मध्ये रूम बुकिंग साठी तेजस्वी यादवांचा पीए प्रीतम कुमारने मदत केली. प्रीतम कुमार याने नॅशनल हायवे अधिकारी प्रदीप कुमार यांच्या फोनवर संपर्क करून सिकंदर कुमार यादव याच्यासाठी 1 मे आणि 4 मे या दोन दिवशी रूम बुकिंग साठी सांगितले. त्यातल्या 1 मे रोजी बुकिंग संदर्भात कोणी ऐकले नाही.
परंतु 4 मे रोजी प्रीतम कुमार याने पुन्हा फोन करून रूम बुकिंग संदर्भात सांगितले. सिकंदर कुमार यादव इंदू नॅशनल हायवेच्याच गेस्ट हाऊस मध्ये उतरला. परंतु त्याची पावती मात्र बनवली गेली नाही, असा आरोप बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. या पत्रकार परिषदेत विजय सिन्हा यांनी तेजस्वी यादवांचा पीए प्रीतम कुमार याच्या मोबाईल फोनवरून झालेल्या संभाषणाचे सगळे डिटेल्स नंबर सकट सादर केले. संभाषणादरम्यान तेजस्वी यादव यांचा उल्लेख “मंत्रीजी” असा करण्यात आल्याचे विजय सिन्हा यांनी नमूद केले.
पेपर फुटीचा मास्टर माईंड सिकंदर कुमार यादवने 4 विद्यार्थ्यांना गेस्ट हाऊस मधल्या रूमवर बोलवले. त्यांच्या हातात प्रश्नपत्रिका सोपवली. त्यांच्याकडून प्रत्येकी 40 लाख रुपये घेतल्याची माहिती समोर आली. दुसऱ्या दिवशी NEET परीक्षा पार पडली. त्या परीक्षेचा पेपर आणि आदल्या दिवशीचा पेपर 100% समान होता. हे 4 विद्यार्थी पेपर फुटीत अडकल्यानंतर त्यांच्या कबली जबाबातून सिकंदर कुमार यादवचा कारनामा समोर आला. त्याचे आणि तेजस्वी यादवांचा पीए प्रीतम कुमार याचेही कनेक्शन समोर आले. मात्र, तेजस्वी यादव यांनी या प्रकरणात अद्याप तोंडही उघडलेले नाही. त्यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते मात्र त्यांचे समर्थन करत फिरत आहेत.
राहुल गांधींचे मोदींवर शरसंधान
एकीकडे NEET परीक्षा पेपर फुटीत तेजस्वी यादव यांच्या पीए चे नाव आल्यानंतर दुसरीकडे राहुल गांधींनी काँग्रेसच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रत्यारोप केले. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पितृसंस्थेने गेल्या 10 वर्षांमध्ये ताब्यात घेतलेल्या शिक्षण व्यवस्थेमुळे पेपर फुटले. एकीकडे नरेंद्र मोदी रशिया आणि युक्रेन यांच्यातले युद्ध एका कॉलवर थांबवू शकत असल्याचे सांगितले गेले, तसाच हस्तक्षेप त्यांनी गाझामध्ये केल्याचेही बोलले गेले. पण नरेंद्र मोदी भारतातली पेपर फुटी थांबू शकले नाहीत, असा टोला राहुल गांधींनी हाणला.
नरेंद्र मोदींचे पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य या महत्त्वाच्या विषयाकडे लक्षच नाही. कारण त्यांना लोकसभेच्या सभापतींची निवड करायची आहे. त्याखेरीस त्यांना दुसरा कुठलाही मुद्दा सूचत नाही. त्यांना आपले अल्पमतातले सरकार वाचविणे अवघड झाले आहे. नरेंद्र मोदी त्यामुळे द्विधा मनःस्थितीत आहेत. मानसिक दृष्ट्या खचले आहेत, शेरेबाजी राहुल गांधी यांनी केली.
मात्र पेपर फुटी मध्ये तेजस्वी यादव आणि त्यांचा पीए यांचा नेमका काय आणि कसा हात होता??, ते मुख्य आरोपीच्या अकमोडेशनची सरकारी गेस्ट हाउस मध्ये का सोय करत होते??, याविषयी त्यांना कोणी प्रश्न विचारले नाहीत. त्यामुळे त्यांनी त्याची उत्तरे दिली नाहीत.
Tejashwi Yadav connection with NEET paper leak
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या अनपेक्षित अपयशाच्या दुष्परिणाम; संसदेभोवती घट्ट आवळला घराणेशाहीचा फास!!
- भारतीय नौदलाच्या ताफ्यात आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या सहा पाणबुड्यांचा समावेश
- राहुल गांधी रायबरेली ठेवणार, वायनाड सोडणार; प्रियांका गांधी तिथून लढणार!!
- अर्थसंकल्प 2024: अर्थमंत्री सीतारामन अर्थसंकल्पापूर्वी उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेणार