- पियुष गोयल ,नितीन गडकरी, राजनाथ सिंह मोदींचे त्रिदेव!गोयल यांची तत्पर ऑक्सिजन एक्सप्रेस, नितीन गडकरी यांचे रेमेडेसिव्हर, ऑक्सिजन अन् व्हेंटीलेटरसाठी शर्थीचे प्रयत्न आणि आता राजनाथ सिंहची अलर्ट सेना.
- एका मिनिटात 1000 लिटर ऑक्सिजन, ‘तेजस’च्या तंत्रज्ञानाने होणार ऑक्सिजनची निर्मिती.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये आपल्या देशाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अचानक कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे औषधे आणि ऑक्सिजन मिळू शकत नाहीये. मोदी सरकार ह्या संकटावर मात करण्यासाठी सर्वतोपरी सज्ज झाले आहे. आता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.वायुसेनेतील तेजस लढाऊ विमानात विकसित केलेली ‘ऑन-बोर्ड ऑक्सिजन जनरेशन सिस्टम’ (ओबीओजीएस) आता कोव्हिड च्या रूग्णांना ऑक्सिजन पुरवणार. विशेष म्हणजे तेजससाठी विकसित केलेली ‘ऑन-बोर्ड ऑक्सिजन जनरेशन सिस्टम’ (ओबीओजीएस) प्रति मिनिट 1000 लिटर ऑक्सिजन तयार करू शकते.Tejas fighter jet’s oxygen plant pressed into coronavirus duty
संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार या ऑक्सिजन उत्पादक तंत्रज्ञानाचे / खासगी उद्योगात हस्तांतरण करण्यात आले. उत्तर प्रदेश सरकारने अशा प्रकारच्या 5 प्लांट्सची ऑर्डर देण्यात आली आहे. मंगळवारी संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात याला दुजोरा देण्यात आला आहे. डीआरडीओचे अध्यक्ष सतीश रेड्डी यांनी संरक्षण मंत्रालयाला सांगितले की. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी अशा इतर प्लांट्स इंडस्ट्रीच्या माध्यमातून पुरवठा केला जाऊ शकतो.
एका मिनिटात 1000 लिटर ऑक्सिजन
कोविड -19 युद्धात त्या संरक्षण तंत्रज्ञानाचा प्रयोग केला जाईल, जे ऑन बोर्ड ऑक्सिजन जनरेशन सिस्टम (ओबीओजीएस) म्हणून ओळखले जाते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने तेजस फायटर जेटमध्ये ऑक्सिजन पुरविला जातो. या तंत्राच्या सहाय्याने तयार होणाऱ्या ऑक्सिजनचा उपयोग नागरी हेतूसाठी केला जाईल. या ऑक्सिजन निर्मिती प्लान्टच्या मदतीने, दर मिनिटाला एक हजार लिटर ऑक्सिजन तयार केले जाऊ शकते.
ओबीओजीएस(OBOGS) तंत्रज्ञान म्हणजे काय?
डीआरडीओच्या म्हणण्यानुसार ओबीओजीएस(OBOGS) म्हणजे लाईफ सपोर्ट सिस्टम जी उंचावर आणि हाय स्पीड फायटर एअरक्राफ्टमधील एअरक्रूला संरक्षण पुरविते. ओबीओजीएसच्या मदतीने लिक्विड ऑक्सिजन सिस्टम म्हणजेच एलओएक्स(LOX)च्या जागी विमानाच्या इंजिनमधून निघणाऱ्या हवेचा प्रयोग करुन आणि अणूंना एक प्रकारची आण्विक चाळणी(molecular sieve), ज्याला जोलाइट म्हणतात, त्याला प्रेशर स्विंग एडसॉरप्शन(PSA)तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगळे करते. या प्रणालीमध्ये ऑक्सिजनसह येणाऱ्या दोन आण्विक चाळणी(molecular sieve)चे दोन थर असतात. या मदतीने एअरक्रूला लगातार ऑक्सिजन पुरविला जातो.
सियाचीनसारख्या ठिकाणी तैनात असलेल्या सैन्यासाठी वापरली जाणाऱ्या पूरक ऑक्सिजन वितरण प्रणाली सादर करण्यात आली आहे. डीआरडीओच्या म्हणण्यानुसार, यावेळी कोविड -19 ची जी परिस्थिती आहे, त्यात रुग्णांची स्थितीही त्या सैनिकांसारखीच आहे. डीआरडीओला आशा आहे की, लवकरच SpO2 अर्थात Blood Oxygen Saturation वर आधारीत हे उत्पादन बाजारात उपलब्ध होईल.