प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यासाठी गुरुवारी (25 मे) पालम विमानतळावर आलेल्या तरुणाने एका वृत्तवाहिनीशी बोलताना पंतप्रधानांचे कौतुक केले. नुर्शीद अली नावाचा तरुण म्हणाला होता, मी भाजपचा कार्यकर्ता नाही, तर मोदी भक्त आहे. माझी छाती फाडून पाहा तुम्हाला मोदीजीच दिसतील. मागच्या 9 वर्षांपासून मी त्यांची झलक मिळण्याची वाट पाहत आहे. माझ्या स्वप्नातही मोदीच येतात. असे तो तरुण म्हणाला होता. त्याची ही क्लिप अवघ्या देशात व्हायरल झाली होती. यावर आता पीएम मोदींनीही प्रतिक्रिया दिली आहे.’Tear my chest… Only Modi will be seen’, Prime Minister Modi reacted to the young man’s sentiments, saying – this is the love of crores of countrymen.
त्यांनी या तरुणाचे शब्द उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी असल्याचे सांगितले. व्हिडिओ शेअर करताना पंतप्रधानांनी ट्विट केले की, हे करोडो देशवासीयांचे प्रेम आणि विश्वास आहे, जे मला नवीन ऊर्जा देते आणि प्रत्येक क्षणी देशाची सेवा करण्याची प्रेरणा देते.
नजफगढचा रहिवासी असलेला नुरशीद अली गुरुवारी पहाटे 3 वाजता पंतप्रधानांच्या स्वागतासाठी पालम विमानतळावर पोहोचला होता. त्याने त्याच्यासोबत पंतप्रधानांचे चित्रही रेखाटून आणले होते. स्वत:ला पीएम मोदींचे समर्थक म्हणणारा नूरशीद अली म्हणाला की, गेल्या 9 वर्षांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
“पंतप्रधानांनी जगामध्ये देशाचा नावलौकिक केला”
अली म्हणाला की, मला पंतप्रधान मोदी आवडतात कारण त्यांनी माझ्या देशाला जगात गौरव मिळवून दिला आहे. माझा देश माझ्या धर्माच्या पुढे आहे. तीन देशांचा सहा दिवसांचा दौरा संपवून पंतप्रधान मोदी गुरुवारी सकाळी दिल्लीत परतले. मायदेशी परतल्यावर भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केले.
पंतप्रधानांनी केले संबोधित
पालम विमानतळाबाहेर त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या लोकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी भारताच्या आणि परदेशातील लोकांच्या ताकदीबद्दल आत्मविश्वासाने बोलतो आणि जग ऐकते, कारण येथील जनतेने सरकारला पूर्ण बहुमत दिले आहे. पंतप्रधान म्हणाले की, जागतिक नेत्यांना माहिती आहे की ते जे बोलतात तो भारतातील 140 कोटी लोकांचा आवाज आहे.”
‘Tear my chest… Only Modi will be seen’, Prime Minister Modi reacted to the young man’s sentiments, saying – this is the love of crores of countrymen.
महत्वाच्या बातम्या
- SBI : 2000 च्या नोटा बदलून घेताना स्लिप भरण्याची गरज नाही; स्टेट बँकेचा खुलासा
- इतिहासातील 10 अशा घटना जेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी केले होते लोकशाहीच्या मंदिरांचे उद्घाटन, सोनिया गांधी- राहुल गांधी यांनी पदावर नसतानाही केली होती पायाभरणी
- राजस्थान : …अखेर पाकिस्तानातून भारतात आश्रयास आलेल्या हिंदूंना जमीन मिळणार; जिल्हाधिकारी टीना दाबींची आश्वासनपूर्ती
- विरोधक पाला पाचोळ्यासारखे उडून जातील; केजरीवाल – ठाकरे – पवार भेटीवर मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी