• Download App
    नवीन संसद भवनात 'एक भारत, सर्वोत्तम भारत'ची झलक; महाराष्ट्रातून सागवान, राजस्थानचे संगमरवर तर उत्तर प्रदेशातून कार्पेट! Teak from Maharashtra marble from Rajasthan and carpet from Uttar Pradesh for the construction of the new Parliament building

    नवीन संसद भवनात ‘एक भारत, सर्वोत्तम भारत’ची झलक; महाराष्ट्रातून सागवान, राजस्थानचे संगमरवर तर उत्तर प्रदेशातून कार्पेट!

    जाणून घ्या, देशभरातील कोणत्या ठिकाणाहून  नेमकं काय आणलं गेलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : नवी संसद भवन जितकी मोठी वास्तू आहे तितकीच ती स्मार्ट सुविधांनीही सुसज्ज आहे. तेवढीच मोठी त्याच्या निर्मितीची कथा देखील आहे. एकप्रकारे ‘लोकशाहीचे मंदिर’ उभारण्यासाठी संपूर्ण देश एकत्र आला आहे. नवीन संसद भवनाच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य देशातील विविध राज्यांमधून मागवण्यात आले आहे. त्यातून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चा खरा आत्मा दिसून येतो. Teak from Maharashtra, marble from Rajasthan and carpet from Uttar Pradesh for the construction of the new Parliament building

    पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. यासोबतच पंतप्रधान मोदी ऐतिहासिक राजदंड सेंगोलही बसवणार आहेत. सेंगोल सभापतींच्या आसनासमोर ठेवण्यात येणार आहे.

    नवीन संसदेच्या बांधकामासाठी वस्तू कोठून आणल्या आहेत? –

    संसदेसाठी सागवान लाकूड महाराष्ट्रातील नागपूर येथून नेण्यात आले आहे, अशोक प्रतीक महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि राजस्थानमधील जयपूर येथून आणण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून नवीन संसदेसाठी कार्पेट मागविण्यात आले होते., बांबूच्या लाकडाची फ्लोअरिंग त्रिपुराची राजधानी आगरतळा येथून मागवली आहे, सँडस्टोन म्हणजेच वाळूचा खडक (लाल आणि पांढरा) राजस्थानमधील सर्मथुरा विकत नेला आहे.

    याशिवाय, राजस्थानमधील राजनगर आणि उत्तर प्रदेशातील नोएडा येथून दगड जाळीचे काम करून घेण्यात आले आहे,  अशोक चक्र मध्य प्रदेशातील इंदूर येथून घेण्यात आले आहे, काही प्रमाणात फर्निचरही मुंबईहून आणले होते, लाल लाख हे राजस्थानमधील जैसलमेर येथून घेतले आहे, राजस्थानातील अंबाजी येथून पांढरे संगमरवरी दगड खरेदी करण्यात आले आहेत, भगवा हिरवा दगड राजस्थानच्या उदयपूर येथून आणला आहे,  दगडी कोरीव काम अबू रोड आणि उदयपूर येथून करून घेण्यात आले. राजस्थानमधील कोतपुतली येथूनही काही दगड आणले होते.

    याचबरोबर M-वाळू  हरियाणातील चकरी दादरी येथून, Fly Ash Bricks – एनसीआर, हरियाणा आणि उत्तर प्रदेश येथून खरेदी करण्यात आली , अहमदाबाद येथून पितळी काम आणि प्री-कास्ट स्ट्रेंच घेण्यात आले ,एलएस/आरएस फॉल्स सीलिंग स्टील स्ट्रक्चर दमण आणि दीवमधून आणले गेले.

    Teak from Maharashtra marble from Rajasthan and carpet from Uttar Pradesh for the construction of the new Parliament building

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला