या आर्थिक वर्षाच्या शेवटी, टीसीएस ७८ हजार पदवीधरांची भरती करण्याचे लक्ष्य साध्य करणार आहे.TCS Recruitment Drive: TCS, the world’s largest IT company, will provide jobs to 35,000 graduates
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : टीसीएस जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी आहे.जगातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान (IT) सेवा देणारी म्हणून या कंपनीला ओळखले जाते. या आर्थिक वर्षाच्या शेवटी, टीसीएस ७८ हजार पदवीधरांची भरती करण्याचे लक्ष्य साध्य करणार आहे.
या दिशेने कंपनीने ३५ हजार नवीन पदवीधरांच्या नियुक्तीसाठी नोटीस जाहीर केली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस तर्फे २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत ३५ हजार फ्रेशर्सना संधी देण्यात येणार आहे. पहिल्या सहामाहीत एकूण ४३ हजार फ्रेशर्सना कामाची संधी देण्यात आली होती.
कंपनीच्या भविष्यातील गरजा ओळखून ही भरती केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS ने २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ४३ हजार फ्रेशर्सना काम करण्याची संधी दिली. आता पुढील सहामाहीत ३५ हजार फ्रेशर्सची भरती करणार आहे.
या कंपनीचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. टीसीएस कंपनीने गेल्या तिमाहीत एकूण १९ हजार ६९० कर्मचाऱ्यांची भरती केली. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या ५ लाख २८ हजार ७४८ वर गेली आहे. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या ३६.२ टक्के आहे.
TCS Recruitment Drive: TCS, the world’s largest IT company, will provide jobs to 35000 graduates
महत्त्वाच्या बातम्या
- WHO शोधून काढणार कोरोना आणि इतर विषाणूंचा उगम, नेमली २६ तज्ञ सदस्यांची समिती
- ठाकरे – पवार सरकारची दसरा भेट… पण आमदारांना…!!… कोणती??
- SCO Webinar : आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर राजनाथ सिंह यांनी इंदिरा गांधींचे केले कौतुक , सशस्त्र दलांमध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची
- The Focus India Explainer : केंद्राने BSFचे अधिकार क्षेत्र का वाढवले? काय आहेत कारणे? वाचा सविस्तर…