प्रतिनिधी
नवी दिल्ली : विविध राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्ष संघटनेत मोठ्या प्रमाणावर फेरबदल केले असून मराठी नेत्यांकडे भाजपच्या संघटनात्मक पातळीवरच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. विनोद तावडे, प्रकाश जावडेकर, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्याकडे मोठ्या राज्यांच्या जबाबदाऱ्या पक्षाने सोपविल्या आहेत. Tawde, Javadekar, Munde, Rahatkar have responsibilities of big states
विनोद तावडे यांच्याकडे बिहारचे प्रभारी पद, तर जावडेकर यांच्याकडे केरळचे प्रभारी पद सोपविले आहे. त्याचवेळी पंकजा मुंडे यांच्याकडे मध्य प्रदेशाचे सहप्रभारी पद कायम ठेवले असून विजया रहाटकर यांच्याकडे राजस्थानचे सहप्रभारी पद सोपविले आहे.
त्याचबरोबर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय भाई रूपाणी यांच्याकडे पंजाब सारख्या महत्त्वाच्या राज्याची जबाबदारी प्रभारी म्हणून सोपविली आहे. राजस्थानच्या प्रभारीपदी खासदार अरुण सिंह तर मध्यप्रदेशच्या प्रभारीपदी पी. मुरलीधर राव यांची नियुक्ती नड्डा यांनी केली आहे.
तावडेंपुढे बिहार मधले आव्हान
बिहारमध्ये नितीश कुमार यांनी नुकतीच बाजू बदलून सत्तांतर घडविले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप तेथे प्रबळ विरोधी पक्ष बनला असताना त्याला सत्तेपर्यंत नेण्याची जबाबदारी प्रभारी म्हणून विनोद तावडे यांची असणार आहे. एकाच वेळी नितीश कुमार यांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा आणि तेजस्वी यादव यांची प्रदेश पातळीवरची महत्त्वाकांक्षा यांच्याशी टक्कर घेण्यात विनोद तावडे हे बिहार प्रदेश भाजपला किती सक्षम करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तावडे यांनी हरियाणा मध्ये ही कामगिरी करून दाखवली आहे. बिहारमध्ये भाजपची संघटना निश्चितच बळकट आहे. तिला अधिक बळकटी देण्याची कामगिरी विनोद तावडे यांना करावी लागणार आहे.
राजस्थानात सत्ता बदलाचे आव्हान
राजस्थानमध्ये पुढच्या वर्षाच्या सुरुवातीलाच विधानसभा निवडणूक आहे. तेथे अशोक गेहलोत सरकार विरुद्ध जनभावना तीव्र आहेत. भाजपची तेथे संघटनात्मक बैठक मजबूत आहे. पण तेथे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि भाजपच्या प्रदेश पातळीवरच्या नेत्यांमध्ये राजकीय मतभेद आहेत ते मतभेद दूर करून भाजप पक्ष संघटनेत जान फुंकण्याची कामगिरी अरुण सिंह आणि विजया रहाटकर यांना करावी लागणार आहे.
जावडेकरांचे कसब केरळमध्ये पणाला
प्रकाश जावडेकर यांच्याकडे ज्या केरळ राज्याची जबाबदारी सोपविली आहे, ते राज्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनेच्या दृष्टीने मजबूत मानले असले तरी भाजपला तेथे निवडणुकीच्या पातळीवर अद्याप यश आलेले नाही. भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पूर्व आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर जावडेकर यांच्याकडे दिलेल्या केरळ राज्याच्या जबाबदारीला विशेष महत्त्व आहे. जावडेकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री तर होतेच, पण नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना अरुण जेटली हे प्रभारी तर जावडेकर हे सहप्रभारी म्हणून त्यांनी मोदींबरोबर गुजरात मध्ये पक्ष संघटनेचे काम केले आहे.
2024 ची लोकसभा निवडणूक आणि पुढील वर्षी 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर मराठी नेत्यांकडे भाजपने महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सुकवून विश्वास दाखवला आहे.
Tawde, Javadekar, Munde, Rahatkar have responsibilities of big states
महत्वाच्या बातम्या
- आधी एकत्र येऊ, मग नेता निवडू : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी घेतली शरद पवारांची भेट
- पीएम- श्री अंतर्गत देशभरातील 14,597 शाळा होणार अद्ययावत : पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया योजनेस मंजुरी
- नवरात्रोत्सवात मंत्रिमंडळ विस्तार : स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंनी सागितली वेळ
- मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेननच्या कबरीचे उद्दात्तीकरण!!; महाराष्ट्रभर संताप!!