• Download App
    सरकारी विमान कंपनी एअर इंडियासाठी आता थेट टाटांचीच बोली Tata will try to buy Air India

    सरकारी विमान कंपनी एअर इंडियासाठी आता थेट टाटांचीच बोली

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – कर्जामुळे तोट्यात गेलेली सरकारी विमान कंपनी एअर इंडियासाठी टाटा बोली लावणार असल्याची माहिती आहे. ‘स्पाईस जेट’चे प्रवर्तक अजय सिंह यांनीही बोली लावल्याचे समजते. जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये सुरू केलेल्या टाटा एअरलाईन्सचे रूपांतर नंतर एअर इंडियामध्ये झाले होते. Tata will try to buy Air India

    जर टाटाने बोली जिंकली, तर त्यांना एअर इंडियामध्ये मालकी हक्क मिळतील. आर्थिक बोलींचे मूल्यमापन करण्यास व्यवहारांचे सल्लागार किती वेळ घेतील व एअर इंडियाच्या नव्या मालकाची घोषणा केंद्र सरकार केव्हा करेल, हे अनिश्चित आहे. मात्र सल्लागारांना त्यासाठी तीन ते चार महिने लागतील व त्यानंतर नव्या मालकाला एअर इंडियाचा ताबा देण्यास आणखी काही महिने लागतील, अशी अपेक्षा आहे.



    एअर इंडियाचे संपूर्ण भागभांडवल विकण्याचा सरकारचा इरादा आहे. २०१९-२० मध्ये एअर इंडियावरील एकूण कर्ज ३८ हजार ३६६ कोटींहूनही जास्त आहे, असे नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांनी फेब्रुवारी महिन्यात संसदेत सांगितले होते.

    खरेदी व्यवहार पाहणारे सचिव तुहिन पांडे यांनीही एअर इंडियासाठी काही बोली सल्लागारांकडे आल्याची माहिती ट्विटद्वारे दिली. आता पुढील प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, असेही ते म्हणाले.

    Tata will try to buy Air India

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के