विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – हवाई दलासाठी ‘ट्विन टर्बोटॉप सी-२९५’ ही मालवाहतुकीसाठीची ५६ विमाने खरेदी करण्यास संरक्षण विषयक कॅबिनेट समितीने मंजुरी दिली. हवाई दलाकडे सध्या असलेल्या एव्हरो विमानांची जागा ही नवी विमाने घेतील.TATA will made cargo planes for Defense forces
एअरबस डिफेन्स अँड स्पेस कंपनीकडून १६ विमाने पूर्णपणे तयार स्वरुपात घेण्यात येतील, तर ४० विमानांचे उत्पादन ‘टाटा’च्या मदतीने भारतात करण्यात येणार आहे. लष्करासाठीची विमाने खासगी कंपनीमार्फत तयार करण्याची ही पहिलीच वेळ असेल. सर्व विमाने भारतीय बनावटीच्या ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सुट’ने सुसज्ज असतील. विमानाचे काही भाग भारतातच तयार करण्यात येणार आहेत. याद्वारे ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला चालना देण्यात येणार आहे.
विमानांचे सुटे भाग भारतात तयार करण्यात येणार असल्याने ६०० कुशल रोजगार, तर तीन हजारांहून अधिक अप्रत्यक्ष रोजगार आणि ३००० मध्यम कौशल्याचे रोजगार उपलब्ध होऊ शकतील, असे संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे.
‘सी-२९५एमडब्लू’ हे मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणारे विमान आहे. दहा टनांपर्यंत साहित्य वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. पहिली १६ विमाने ४८ महिन्यांमध्ये स्पेनहून भारतात आणण्यात येतील. उर्वरित विमाने भारतात तयार करण्यात येतील.
TATA will made cargo planes for Defense forces
महत्त्वाच्या बातम्या
- आकाशावर लक्ष ठेवण्यासाठी हवाई दलाला मिळणार सहा विमाने, अकरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर
- भाषिक कट्टरता धोकादायक, हिंदी अधिकृत भाषा नसणाऱ्या राज्यांशी केंद्राने साधावा इंग्रजीमध्ये संवाद, मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश
- लस न घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर पंजाब सरकारचा बडगा, 15 सप्टेंबरनंतर सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश
- वर्क फ्रॉम होम नको रे बाप्पा..! तातडीने वर्क फ्रॉम ऑफिस सुरु न केल्यास लग्न टिकणारच नसल्याने कर्मचार्याच्या पत्नीचे उद्योगपतीला साकडे