• Download App
    टाटा इनोव्हेशन फेलोशिप रजिस्ट्रेशन झाले सुरू! पहा कसे करायचे फेलोशिपसाठी अप्लाय | Tata Innovation Fellowship registration started! See how to apply for a fellowship

    टाटा इनोव्हेशन फेलोशिप रजिस्ट्रेशन झाले सुरू! पहा कसे करायचे फेलोशिपसाठी अप्लाय

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : बायोटेक्नॉलॉजी विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने टाटा इनोव्हेशन फेलोशिप नुकतीच जाहीर केली आहे. आरोग्य सेवा, कृषी, पर्यावरण आणि इतर संबंधित क्षेत्रातील प्रमुख समस्यांवर इनोव्हेटिव्ह उपाय शोधण्यासाठी जैविक क्षेत्रातील संशोधनास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ही फेलोशिप दिली जाते.

    Tata Innovation Fellowship registration started! See how to apply for a fellowship

    फेलोशिप द्वारे संबंधित संस्थेकडून नियमित वेतन मिळेल त्याचप्रमाणे 25,000 प्रति महिना ही फेलोशिप अमाऊंट देखील उमेदवारांना मिळणार आहे. अशाप्रकारे वार्षिक 6 लाखा पर्यंत अनुदान संबंधित उमेदवारास मिळू शकते.

    उमेदवारांनी 30 नोव्हेंबर किंवा त्यापूर्वी DBT वेबसाइटवर उपलब्ध असलेला अर्ज भरून सबमिट करणे आवश्यक आहे.


    आंतरराष्ट्रीय पातळीवर सक्रीय वैमानिक, वैद्यकीय अधिकारी, विज्ञान, उद्योजकता आणि तंत्रज्ञानातील नावीन्यतेसाठी आणि नेतृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या शौना पंड्या यांच्याबद्दल थोडं


    खाली दिलेल्या पत्त्यावर अर्जाची हार्ड कॉपी पाठवणे आवश्यक आहे.
    डॉ. देव प्रकाश चतुर्वेदी, सायंटिस्ट-सी, रूम नंबर ८१४, बायोटेक्नॉलॉजी विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, मजला, ब्लॉक-२, यांना पाठवावा. CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली -110003

    हे अर्ज 30 नोव्हेंबर 2021 पूर्वी पाठवणे आवश्यक आहे.

    अर्जाची सॉफ्ट खाली दिलेल्या DBT पोर्टलद्वारे सबमिट करणे आवश्यक आहे.
    (url: http://www.dbtepromis.gov.in/किंवा http://www.dbtepromis.nic.in/(X(1))/Login.aspx)
    अर्जाची हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी 30 नोव्हेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी सबमिट करने आवश्यक आहे.

    Tata Innovation Fellowship registration started! See how to apply for a fellowship

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य