• Download App
    टाटा समूहाने अदानी-अंबानींना मागे टाकत बनवला 'हा' मोठा विक्रम|Tata group made this big record beating Adani Ambani

    टाटा समूहाने अदानी-अंबानींना मागे टाकत बनवला ‘हा’ मोठा विक्रम

    टाटा समूहाच्या एकूण 25 कंपन्या भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातील ज्येष्ठ आणि दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या टाटा समूहाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आजकाल इतर औद्योगिक दिग्गजांना अदानी आणि अंबानी सारख्या गटांसमोर फार कमी संधी असल्याचे दिसते. जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये गणले जाणे असो किंवा इतर कोणत्याही प्रसंगात, सामान्यतः अदानी आणि अंबानींवर लक्ष केंद्रित केले जाते. पण याच दरम्यान रतन टाटांच्या मालकीच्या टाटा समूहाने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. टाटा समूहाने अदानी आणि अंबानीसारख्या समूहांनाही मागे टाकले आहे. काय आहे हा विक्रम जाणून घेऊया.Tata group made this big record beating Adani Ambani



    टाटा समूहाने देशातील असा पहिला कॉर्पोरेट समूह बनण्याचा मान मिळवला आहे, ज्याचे बाजार भांडवल म्हणजेच मार्केट कॅप 30 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. सध्या मार्केट कॅपच्या बाबतीत टाटांच्या पुढे कोणी नाही. जर आपण देशातील दुसऱ्या क्रमांकाबाबत बोललो तर मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाचा नंबर आहे.

    टाटा समूहाचा विक्रम बनवण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे भारतीय शेअर बाजारात त्याचा वाटा प्रचंड आहे. टाटा समूहाच्या एकूण 25 कंपन्या भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत. त्याच वेळी, या समूहातील केवळ 5 कंपन्यांचा बाजार भांडवलात 80 टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे. यापैकी, समूहाची सर्वात मोठी कंपनी म्हणून, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS ही सर्वात मौल्यवान आहे. या एकट्या कंपनीने अलीकडेच एमकॅपमध्ये 15 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

    Tata group made this big record beating Adani Ambani

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!