वृत्तसंस्था
नवी दिल्ली : बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांदरम्यान बांगलादेशी लेखिका आणि कार्यकर्त्या तस्लिमा नसरीन ( Taslima Nasreen )यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या धोरणांवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये शेख हसीना आणि आंदोलकांचा उल्लेख केला आहे. तस्लिमा नसरीन म्हणाल्या, “इस्लामिक कट्टरपंथीयांना खुश करण्यासाठी हसीना यांनी, 1999 मध्ये जेव्हा मी माझ्या आईला मृत्यूशय्येवर पाहण्यासाठी बांगलादेशात प्रवेश केला तेव्हा मला माझ्या देशातून हाकलून दिले आणि मला पुन्हा देशात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. त्याच इस्लामिक कट्टरपंथींचा यात सहभाग आहे. विद्यार्थी चळवळ ज्याने हसीना यांना देश सोडण्यास भाग पाडले.”
तस्लिमा नसरीन यांच्यावर बांगलादेशमध्ये बंदी घालण्यात आली होती, त्यानंतर त्या भारतात आल्या आणि राहू लागल्या.
तस्लिमा नसरीन यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला, त्यांच्या परिस्थितीला त्या स्वतः जबाबदार आहेत. त्यांनी इस्लामिक कट्टरपंथींना वाढू दिले, त्यांनी आपल्या लोकांना भ्रष्टाचारात अडकू दिले.
त्या पुढे म्हणाल्या की, आता बांगलादेश पाकिस्तानसारखा होऊ नये. सैन्याने राज्य करू नये. राजकीय पक्षांनी लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता आणली पाहिजे.
बांगलादेश मध्ये सत्तापालट
बांगलादेशात हिंसाचाराच्या दरम्यान सत्तापालट झाला आहे. पंतप्रधान शेख हसिना यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना यांनीही बांगलादेश सोडला आहे. दुसरीकडे, बांगलादेशात बंडानंतर जमाव रस्त्यावर उतरला आहे. ज्यांनी दुपारी पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसून लूटमार केली. त्यानंतर अवामी लीगच्या अनेक खासदार आणि मंत्र्यांच्या घरांवर, कार्यालयांवरही हल्ले करून त्यांना आग लावण्यात आली. बांगलादेशात चार हिंदू मंदिरांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. संपूर्ण जगाच्या नजरा यावेळी बांगलादेशकडे लागल्या आहेत. यासोबतच जगाचे लक्ष भारताकडे आहे, कारण शेख हसीना अजूनही भारतात आहेत.
Taslima Nasreen On Bangladesh PM Shaikh Hasina Resignation
महत्वाच्या बातम्या
- Jammu and Kashmir : ‘जम्मू-काश्मीरमध्ये पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार’ केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती!
- West Bengal : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेत पहिल्यांदाच भाजप आणि तृणमूलचे झाले एकमत
- Raj Thackeray : राज ठाकरेंनी बोलायची तयारी दाखवली तरी मराठा आंदोलकांचा राडा; मनोज जरांगेंच्या नावाने घोषणा!!
- Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल तुरुंगातच राहणार, दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला!