• Download App
    पोलिस अधिकाऱ्यांना राजकीय पक्षांनी लक्ष्य करणे धक्कादायक, सरन्यायाधीश रमणा यांचे मत |Target to police officer is not good

    पोलिस अधिकाऱ्यांना राजकीय पक्षांनी लक्ष्य करणे धक्कादायक, सरन्यायाधीश रमणा यांचे मत

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – सत्ताधारी पक्षांच्या बाजूने असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना नंतर सत्तेत येणाऱ्या विरोधकांकडून लक्ष्य केले जाण्याच्या घटना वाढल्याबद्दल सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी चिंता व्यक्त केली. देशातील हा ट्रेंड चिंतेत टाकणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.Target to police officer is not good

    याप्रकरणी भाष्य करताना सरन्यायाधीश रमणा म्हणाले, की ‘‘ सध्या देशात सुरू असलेला ट्रेंड हा अत्यंत धक्कादायक असून पोलिस खाते देखील याला जबाबदार आहे. एखादा पक्ष जेव्हा सत्तेत असतो तेव्हा पोलिस त्या पक्षाची बाजू घेतात. कालांतराने दुसरा पक्ष सत्तेवर येतो तेव्हा तो त्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करतो. हे कोठेतरी थांबायला हवे.’’



    न्यायालयाने छत्तीसगडमधील निलंबित अतिरिक्त पोलिस महासंचालक गुरजिंदरपालसिंग यांना अटकेपासून संरक्षण दिले. सिंग यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. राज्य सरकारने भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याचा ठपका ठेवताना सिंग यांना ५ जुलै रोजी निलंबित केले होते. त्यांच्यावर भ्रष्टाचारविरोधी पथकाने देखील कारवाई केली होती. यानंतर आठवडाभरातच त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात आला होता.

    Target to police officer is not good

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation Sindoor : पाकिस्तानला आत घुसून मारणार, बचावाची एकही संधी नाही देणार; आदमपूर हवाई तळावरून मोदींची गर्जना!!

    Dr. Subbanna Ayyappan : पद्मश्री डॉ. सुब्बन्ना अय्यपन यांचा संशयास्पद मृत्यू; श्रीरंगपट्टणाजवळील कावेरी नदीत मृतदेह आढळला

    Posters of Pahalgam : पहलगाम दहशतवाद्यांचे पोस्टर्स प्रसिद्ध, २० लाख रुपयांचा इनाम जाहीर