Target Killing in Kashmir : जम्मू -काश्मीरमध्ये लोकशाहीला मिळत असलेल्या बळामुळे दहशतवादी संघटना खवळल्या आहेत. या निराशेतून त्यांनी आता सर्वसामान्यांनाही लक्ष्य करणे सुरू केले आहे. यामुळे दहशतवाद्यांनी काश्मीर पुन्हा एकदा अस्वस्थ करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी दहशतवादी संघटना नेत्यांबरोबरच आता सर्वसामान्यांनाही लक्ष्य करत आहेत. भ्याड हल्ल्यांच्या माध्यमांतून काश्मीर खोरे पुन्हा भयकंपित करण्याचा त्यांचा विचार असल्याचे मागच्या काही घटनांवरून दिसून येते. काश्मिरी पंडितांनंतर आता अतिरेक्यांनी अल्पसंख्याक शीख समुदायालाही लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. Target Killing in Kashmir Know When Terrorists Attacked Civilians
प्रतिनिधी
श्रीनगर : जम्मू -काश्मीरमध्ये लोकशाहीला मिळत असलेल्या बळामुळे दहशतवादी संघटना खवळल्या आहेत. या निराशेतून त्यांनी आता सर्वसामान्यांनाही लक्ष्य करणे सुरू केले आहे. यामुळे दहशतवाद्यांनी काश्मीर पुन्हा एकदा अस्वस्थ करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी दहशतवादी संघटना नेत्यांबरोबरच आता सर्वसामान्यांनाही लक्ष्य करत आहेत. भ्याड हल्ल्यांच्या माध्यमांतून काश्मीर खोरे पुन्हा भयकंपित करण्याचा त्यांचा विचार असल्याचे मागच्या काही घटनांवरून दिसून येते. काश्मिरी पंडितांनंतर आता अतिरेक्यांनी अल्पसंख्याक शीख समुदायालाही लक्ष्य केल्याचे समोर आले आहे.
काश्मीरमधील या काही घटना विचार करायला लावणाऱ्या आहेत…
2 जून – भाजप नेते राकेश पंडित यांची त्रालमध्ये हत्या.
22 जून – जम्मू -काश्मीरमध्ये 22 जून संध्याकाळी निरीक्षक परवेज अहमद यांना दहशतवाद्यांनी घात लावून हल्ला केला. परवेझ अहमद मशिदीत नमाज अदा करण्यासाठी जात असताना ही घटना घडली. यादरम्यान दोन सशस्त्र दहशतवाद्यांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला.
15 जुलै – भाजप नेते मेहराजुद्दीन मल्ला यांचे सोपोरमध्ये अपहरण करण्यात आले, तरी दहा तासांच्या आत त्यांची सुटका झाली. या घटनेच्या एक महिना आधी 8 जून रोजी अनंतनागमध्ये काँग्रेस नेते आणि सरपंच अजय पंडित यांची हत्या करण्यात आली होती.
17 सप्टेंबर – पोलिसांमध्ये फॉलोअर म्हणून काम करणाऱ्या कुलगामच्या बंटू शर्माला अतिरेक्यांनी जवळून गोळ्या घालून ठार केले. हे कुटुंब 30 वर्षांहून अधिक काळ काश्मीरमध्ये राहत आहे.
5 ऑक्टोबर – इक्बाल पार्कजवळ बिंदरू मेडिकेटचे मालक माखन लाल बिंदरू यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, तेथेच त्यांचा मृत्यू झाला.
5 ऑक्टोबर – श्रीनगरमधील लाल चौकानंतर दहशतवाद्यांनी लाल बाजारवर हल्ला केला. या हल्ल्यात भेळ विकणाऱ्या एका स्थानिक व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मृत वीरेंद्र पासवान हा भागलपूर, बिहारचा रहिवासी होता.
5 ऑक्टोबर – बांदीपोराच्या हाजीन भागात मोहम्मद शफीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला, तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्याचा मृत्यू झाला.
7 ऑक्टोबर – श्रीनगर, जम्मू -काश्मीरच्या सफाकदल भागातील शासकीय मुलांच्या उच्च माध्यमिक शाळेत घुसून दहशतवाद्यांनी दोन शिक्षकांची गोळ्या झाडून हत्या केली. शाळेच्या मुख्याध्यापिका सुपिंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद अशी त्यांची नावे आहेत.
या हल्ल्यांनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्च अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. काश्मिरात सर्वसामान्यांवरील वाढते हल्ले पाहता केंद्रीय यंत्रणा सतर्क झाल्या असून केंद्र आता काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Target Killing in Kashmir Know When Terrorists Attacked Civilians
महत्त्वाच्या बातम्या
- काश्मिरात टारगेट किलिंगचा तालिबान्यांशी संबंध? काश्मिरी पंडितांच्या घरवापसीत दहशतवाद्यांचे अडथळे, काय म्हणतात तज्ज्ञ, वाचा सविस्तर…
- Target Killing In Kashmir : जम्मू -काश्मीरमधील सर्वसामान्यांच्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांची बैठक
- Nobel Prize 2021 : अब्दुलरझाक गुरनाह यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर, शरणार्थींच्या स्थितीचे केले वास्तव चित्रण
- World Most Powerful Passport 2021 : जपान, सिंगापूरचा पासपोर्ट सर्वात पॉवरफुल, भारताचा यादीत ९० वा क्रमांक; पाकिस्तान, उत्तर कोरियाचा मात्र अतिशय कमकुवत
- जगाला मिळाली मलेरियाची लस : WHO कडून पहिल्या मलेरिया लसीला मंजुरी, गंभीर रुग्णांची जोखीम होणार कमी