Solar Cycle : पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. दिवसेंदिवस महाग होत जाणाऱ्या इंधनामुळे महागाईचा भडका उडाला आहे. देशातील अनेक राज्यांत इंधन तेलाने शंभरी ओलांडलेली आहे. अशा परिस्थितीत लोकांनी सार्वजनिक वाहतूक आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे मोर्चा वळवला आहे. तामिळनाडूमधील मदुराई कॉलेजमध्ये शिकणार्या धनुष कुमार या विद्यार्थ्याने एक अनोखी इलेक्ट्रिक सायकल शोधून काढली आहे. Tamilnadu Student Developed Solar Cycle Which runs 50 KM in Just one and Half rupees
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. दिवसेंदिवस महाग होत जाणाऱ्या इंधनामुळे महागाईचा भडका उडाला आहे. देशातील अनेक राज्यांत इंधन तेलाने शंभरी ओलांडलेली आहे. अशा परिस्थितीत लोकांनी सार्वजनिक वाहतूक आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे मोर्चा वळवला आहे. तामिळनाडूमधील मदुराई कॉलेजमध्ये शिकणार्या धनुष कुमार या विद्यार्थ्याने एक अनोखी इलेक्ट्रिक सायकल शोधून काढली आहे.
ही इलेक्ट्रिक सायकल तिच्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. पेट्रोल आणि डिझेलची किंमत कमी करण्याबरोबरच या सायकलच्या वापरामुळे प्रदूषणही कमी होईल. ही सायकल सामान्यांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते.
सौरऊर्जेवर चालणारी सायकल
वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, धनुष कुमारने सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक सायकल शोधून काढली आहे. ही सायकल 50 किमीपर्यंत चालवता येते. याशिवाय चार्ज डाउनलाइन झाल्यावरही सायकल 20 किमी आरामात चालवता येते. या सायकलमध्ये वापरल्या जाणार्या बॅटरीची किंमत पेट्रोलच्या तुलनेत खूपच कमी आहे आणि लोक त्यांच्या सोयीनुसार ती सहज वापरू शकतात.
इलेक्ट्रिक सायकलचे वैशिष्ट्य काय?
या इलेक्ट्रिक सायकलसह 50 किमीपर्यंत प्रवास करण्यासाठी त्याची किंमत 1.50 रुपये आहे. ही ई-सायकल 30 ते 40 किमी प्रतितास वेग मिळवू शकते. या ई-सायकलमध्ये 12 व्होल्टच्या 4 बॅटरी आहेत, 350 वॅटची ब्रश मोटर आहे, वेग वाढविण्यासाठी एक्सिलेटर बसविण्यात आले आहेत. मदुराई कॉलेजमध्ये शिकणाऱ्या धनुष कुमार या विद्यार्थ्याच्या या सायकलचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे.
Tamilnadu Student Developed Solar Cycle Which runs 50 KM in Just one and Half rupees
महत्त्वाच्या बातम्या
- महिलांच्या अंतर्वस्त्रात पुरुष, तर महिला टॉपलेस; बर्लिनच्या रस्त्यांवर का झाले असे आंदोलन? जाणून घ्या!
- मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना मिळणार तब्बल 1.12 लाखांचा बोनस, कठीण काळातही काम केल्याचे बक्षीस
- Peoples Padma Awards : पद्म पुरस्कारांसाठी PM मोदींनी मागितली नावे, असाधारण काम करणाऱ्यांचा होणार सन्मान
- ATS ने अलकायदाचा कट हाणून पाडला, लखनऊसह अनेक जिल्ह्यांत साखळी स्फोट घडवण्यापूर्वी 2 दहशतवाद्यांना अटक, जिवंत प्रेशर कुकर बॉम्बही जप्त
- धक्कादायक : बंगाली अभिनेत्रीला बलात्काराच्या धमक्या, कोलकाता पोलिसांकडून गुन्हा दाखल