विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बंगलोर मध्ये विरोधकांच्या आघाडीची बैठक पार पडून आघाडीला स्वतंत्र I.N.D.I.A नाव देऊन दोनच दिवस उलटत नाहीत तोच, या आघाडीतली राजकीय विसंगती समोर आली आहे. कर्नाटक मधील काँग्रेस सरकार आणि तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम सरकार यांच्यातली भांडणे समोर आली आहेत.Tamilnadu chief minister writes letter to pm modi to direct karnataka Congress government to release kavery water for tamilnadu
तामिळनाडूतल्या जनतेसाठी कर्नाटकातून कावेरी नदीचे पाणी सोडावे यासाठी तिथल्या काँग्रेस सरकारला सूचना द्यावी, अशी विनंती करणारे पत्र तामिळनाडूतील प्रमुख सरकारने केंद्रातल्या मोदी सरकारला पाठविले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे प्रमुख एम. के. स्टालिन हे विरोधी ऐक्याच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी बंगलोरला गेले होते. तेथे मोठी फोटो ऑपॉर्च्युनिटी झाली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी स्टॅलिन यांचे जोरदार स्वागत केले होते. पण त्या बैठकीत कावेरीच्या मुद्द्यावर स्टॅलिन यांना बोलू दिले गेले नाही. तिथे फक्त केंद्रातल्या मोदी सरकारला हटविण्यासाठी I.N.D.I.A आघाडी स्थापन करण्याची घोषणा झाली आणि 26 पक्षांचे सगळे नेते आपापल्या राज्यांमध्ये निघून गेले. एम. के. स्टालिनही तामिळनाडूत निघून गेले. आणि त्यानंतर दोनच दिवसांनी स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कावेरीच्या पाण्यासाठी पत्र पाठविले. या पत्रात त्यांनी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारला कावेरीचे पाणी तामिळनाडूच्या जनतेसाठी सोडण्याची सूचना द्यावी, अशी विनंती केली आहे.
I.N.D.I.A आघाडीतले दोन मुख्यमंत्री आपापल्या राज्यांच्या पलीकडे पाहू शकत नाहीत. त्याहीपेक्षा कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री आपल्याच पक्षाची व्यापक भूमिका समजावून घेऊन तामिळनाडू सारख्या राज्याला पाणी देण्याची मदत करू शकत नाही हे यानिमित्ताने समोर आले आहेत.
इतकेच नाही तर I.N.D.I.A आघाडीतला मुख्य घटक पक्ष काँग्रेस कावेरी ओलांडून धरण बांधण्याच्या तयारीत आहे. यातल्या मुख्य वादावर काँग्रेस आणि प्रमुख यांच्यात एकमत नाही. त्यामुळे हा आंतरराज्य वाद सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठक बोलावण्याची स्टालिन यांनी विनंती केली आहे. अशी ही I.N.D.I.A आघाडी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची टक्कर घेणार आहे.
Tamilnadu chief minister writes letter to pm modi to direct karnataka Congress government to release kavery water for tamilnadu
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार मोठा झटका; नागालँडमधील राष्ट्रवादीच्या सात आमदारांसह, पदाधिकाऱ्यांचा अजित पवारांना पाठिंबा!
- पवार अजूनही सुप्रिया सुळेंच्या हातात सूत्रे का देत नाहीत??; त्यांना जानकी रामचंद्रन, शशिकला, एन. टी रामाराव आठवतात का??
- Manipur violence : ‘’… अन्यथा ईशान्य भारत कायमचा भारतापासून तुटेल’’ राज ठाकरेंचं विधान!