• Download App
    तमिळ चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार विजयकांत यांच्या निधनाने तमिळ राजकारणातले "राज ठाकरे" पर्व अस्तंगत!!|Tamil politics ends with the death of Vijayakanth, the superstar of Tamil film industry!!

    तमिळ चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार विजयकांत यांच्या निधनाने तमिळ राजकारणातले “राज ठाकरे” पर्व अस्तंगत!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : तमिळ चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार आणि तामिळ राजकारणातले “राज ठाकरे” विजयकांत यांचे निधन झाले. त्यांना कोरोना झाला होता ते चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना काही दिवसांपूर्वी व्हेंटिलेटर सपोर्ट वर ठेवले होते परंतु आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली Tamil politics ends with the death of Vijayakanth, the superstar of Tamil film industry!!

    DMDK अर्थात देसिया मुरूपुक्कू द्रविड कळघम हा पक्ष स्थापन करून विजयकांत यांनी तमिळ राजकारणावर मोठा ठसा उमटवला होता. त्याआधी विजयकांत तमिळ चित्रपटसृष्टी मध्ये पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जायचे. कारण त्यांच्या अथवा चित्रपटातल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिका फार गाजल्या होत्या. त्याचबरोबर त्यांना त्यावेळी चित्रपटसृष्टीत “कॅप्टन” देखील म्हटले जायचे कारण त्यांची तमिळ सिनेमातली कॅप्टनची भूमिका ही गाजली होती.



    2005 मध्ये त्यांनी तमिळ राजकारणात प्रवेश केला आणि DMDK या प्रादेशिक पक्षाची स्थापना केली त्यांनी संपूर्ण तामिळनाडूचा झंजावाती दौरा केला आणि अवघ्या 6 वर्षांमध्ये पक्षाला मोठे यश मिळवून दिले होते. 2006 च्या निवडणुकीत पक्षाला यश मिळाले नाही, पण 2011 मध्ये मात्र तामिळनाडू विधानसभेत DMDK पक्षाने फक्त 41 जागा लढवून 29 जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी अण्णाद्रमुक पक्षाचा विजय होऊन जयललिता मुख्यमंत्री झाल्या, तर DMDK पक्षाचे प्रमुख विजयकांत तामिळनाडू विधानसभेतले विरोधी पक्षनेते झाले. त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून 5 वर्षे कारकीर्द गाजवली.

    द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अण्णा द्रविड म्हणून नेत्र कळम या दोनच पक्षांमध्ये खेळले जाणारे तामिळ राजकारण विजयकांत यांच्यामुळे त्रिपक्षीय झाले. तामिळनाडूतील जनतेला DMDK नावाचा एक दमदार पर्याय उपलब्ध झाला. परंतु 2016 नंतर मात्र विजयकांत यांना DMDK पक्षाचे ते यश टिकवता आले नाही. DMDK पक्ष अस्तित्वात राहिला त्याची चर्चाही होत राहिली. परंतु, पक्षाला विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकीत फारसे यश मिळवता आले नाही. तामिळनाडू विधानसभेतले पक्षाचे अस्तित्व संपुष्टात आले. या अर्थाने विजयकांत आणि त्यांचा DMDK पक्ष तामिळनाडूतले “राज ठाकरे” ठरले.

    कारण राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला देखील स्थापनेनंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत मोठे यश मिळाले होते. पक्षाचे 13 आमदार निवडून आले होते. नाशिक सारख्या मोठ्या महापालिकेत पक्षाची सत्ता आली होती. परंतु, हे यश टिकवून वाढविणे राज ठाकरे आणि मनसेला जमले नाही. तशीच अवस्था तामिळनाडूत विजयकांत आणि त्यांचा DMDK पक्ष यांची झाली होती. या अर्थाने विजयकांत यांच्या निधनाने तामिळनाडूतल्या तमिळ राजकारणातले “राज ठाकरे पर्व” अस्तंगत झाले आहे.

     Tamil politics ends with the death of Vijayakanth, the superstar of Tamil film industry!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते