वृत्तसंस्था
चेन्नई : भारतात हलाल इकॉनोमी चालविण्याचा काही इस्लामी मूलतत्त्ववाद्यांचा प्रयत्न सुरू असताना एक गंभीर सामाजिक बातमी समोर आली आहे. तामिळनाडूत हिंदू बहुसंख्यांक असलेल्या गावाच्या जमिनीवर तामिळनाडू वक्फ बोर्डाने आपला दावा सांगितला आहे. यातली गंभीर बाब समोर येताच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी वक्फ बोर्डाच्या मनमानी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.Tamil Nadu Waqf Board Shows Ownership of Hindu Majority Village Land!!
तमिळनाडू वक्फ बोर्ड ही वक्फ कायदा 1954 अंतर्गत स्थापन केलेली एक वैधानिक संस्था आहे, जी वक्फ संस्थांचे पर्यवेक्षण आणि व्यवस्थापन करते आणि वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन करते. इस्लाम धर्म मानणाऱ्या व्यक्तीने मुस्लिम कायद्याद्वारे धार्मिक किंवा धर्मादाय हेतूसाठी दान केलेली स्थावर मालमत्ता यांची देखभाल करते. आता या वक्फ बोर्डाने तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यामधील तिरुचेंदुराई या संपूर्ण गावावर चक्क मालकी हक्क दाखवला आहे.
जमीन विक्रीत वक्फची परवानगी सक्तीची
तमिळ दैनिक दिनमलारने दिलेल्या बातमीनुसार, तिरुचेंदुराई गावात शेतजमीन असलेल्या मुल्लिकारुपूर येथील राजगोपाल यांनी त्यांची १ एकर शेत जमीन राजराजेश्वरी यांना विकण्यासाठी करार केला होता. त्यासाठी ते नोंदणी कार्यालयात 3.5 लाखांची खरेदी कराराची व्यवस्था करण्यासाठी आणि नोंदणी करण्यासाठी गेले, मात्र, ही जमीन तमिळनाडू वक्फ बोर्डाची असल्याने नोंदणी करता येणार नाही, असे सब-रजिस्टारकडून त्यांना सांगण्यात आले.
त्यांना त्यांची जमीन विकण्यासाठी चेन्नईतील तमिळनाडू वक्फ बोर्डाच्या कार्यालयातून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घ्यावे लागेल, असे सब-रजिस्ट्रारने सांगितले. त्यावेळी राजगोपाल यांनी ‘1992 मध्ये खरेदी केलेली जमीन विकण्यासाठी वक्फ बोर्डाकडून एनओसी घेण्याची गरज काय’, अशी विचारणा केली. तेव्हा सब-रजिस्ट्रारने त्यांना सांगितले की, तिरुचेंदुराई गावात कोणत्याही जमिनीची डीड करायची असेल तर वक्फ बोर्डाची परवानगी घ्यावीच लागेल,
वक्फ बोर्डाने संपूर्ण गाव त्यांच्या मालकीचे असल्याचे कागदपत्रांसह नोंदणी विभागाला पत्र पाठवले आहे आणि जे गावात जमिनीसाठी करारनामा करण्यासाठी येतात त्यांने बोर्डाकडून परवानगी घ्यावी लागेल. यासंदर्भातील 250 पानी वक्फ बोर्डाच्या पत्राची प्रतही त्यांना दाखवण्यात आली. त्या पत्रात वक्फ बोर्डाने तमिळनाडूतील हजारो एकर जमीन आपली असल्याचे म्हटले आहे.
वक्फ बोर्डाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
– यावर भाजप नेते अल्लूर प्रकाश यांनी वक्फ बोर्डाच्या या कारभारावर काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. तिरुचेंदुराई गाव हे कावेरी नदीच्या दक्षिण तीरावर असलेले एक नयनरम्य कृषी गाव आहे, जिथे बहुसंख्य लोक हिंदू आहेत. वक्फ बोर्ड आणि तिरुचेंदुराई गाव यांच्यात काय संबंध आहे?
– तेथे मानेंदियावल्ली समेथा चंद्रशेखर स्वामी मंदिर आहे, हे मंदिर 1,500 वर्षे जुने असल्याचे विविध कागदपत्रे आणि पुरावे यांच्यासह सिद्ध होते. तिरुचेंदुराई गावाच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी मंदिराची 369 एकर जमीन आहे. ही मंदिराची जमीनही वक्फ बोर्डाची कशी काय असू शकते?
– जेव्हा गावातील व्यक्तीकडे जमिनीची कागदपत्रे असतात, तेव्हा कोणत्याही पुराव्याशिवाय वक्फ बोर्ड ती मालमत्ता स्वतःची असल्याचे कसे घोषित करू शकते?
– वक्फ बोर्डाने जमिनी आपल्या मालकीच्या असल्याचा दावा करणारे पत्र दिले असले तरी वक्फ बोर्डाच्या दाव्यांची पडताळणी केल्याशिवाय दस्त नोंदणी न करण्याचे आदेश नोंदणी विभागाचे उच्च अधिकारी कसे काय देऊ शकतात?
Tamil Nadu Waqf Board Shows Ownership of Hindu Majority Village Land!!
महत्वाच्या बातम्या
- गोगरा हॉटस्प्रिंगमधून अखेर भारत-चिनी सैन्य परतले : स्टँडऑफ पॉइंटवरील बंकर उद्ध्वस्त, पोस्ट रिकाम्या केल्या
- विश्व हिंदू परिषद : ज्ञानवापी मंदिर मुक्तीतील पहिला अडथळा पार; निर्णय समाधानजनक!!
- व्होकल फॉर लोकल, जीडीपी पलिकडची विकेंद्रीत अर्थव्यवस्था यासाठी संघ कटीबद्ध!!
- लम्पीमुळे पशुधनाची हानी झाल्यास भरपाई; शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय