• Download App
    तामिळनाडूच्या मंत्र्याला पत्नीसह 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा; बेहिशेबी मालमत्तेच्या गुन्ह्यावर कोर्टाचा निर्णय; मंत्रिपदही गेले Tamil Nadu minister sentenced to 3 years imprisonment along with wife

    तामिळनाडूच्या मंत्र्याला पत्नीसह 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा; बेहिशेबी मालमत्तेच्या गुन्ह्यावर कोर्टाचा निर्णय; मंत्रिपदही गेले

    वृत्तसंस्था

    चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाने 21 डिसेंबर रोजी तामिळनाडूचे माजी उच्च शिक्षण मंत्री के पोनमुडी आणि त्यांच्या पत्नीला बेहिशोबी मालमत्ते प्रकरणी तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दोघांनाही प्रत्येकी 50 लाखांचा दंड ठोठावला आहे. 1.75 कोटी रुपयांच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात दोघे पती-पत्नी दोषी आढळले. Tamil Nadu minister sentenced to 3 years imprisonment along with wife

    या प्रकरणी कोर्टाच्या निर्णयानंतर पोनमुडी हे आमदारपदासाठी अपात्र ठरले आहेत. त्यांना मंत्रिपदही गमवावे लागले आहे. याप्रकरणी न्यायालयाचा निकाल येईपर्यंत ते उच्च शिक्षणमंत्री होते. आता हे खाते मागासवर्गीय कल्याण मंत्री आरएस राजकन्नप्पन यांना देण्यात आले आहे.

    तामिळनाडूच्या राजभवनाने एक प्रेस नोट जारी करून ही माहिती दिली. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राज्यपाल आर एन रवी यांच्याकडे याची शिफारस केली होती, त्यांना राजभवनाने मान्यता दिली असल्याचे सांगण्यात आले.

    कोर्टाने आत्मसमर्पण करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली आहे.

    न्यायमूर्ती जी जयचंद्रन यांनी हा निर्णय दिला. उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आरोपी एनआर एलांगोच्या वकिलाने अपील केले, माझ्या अशिलाची शिक्षा 30 दिवसांसाठी स्थगित करण्यात यावी. जेणेकरून ते शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतील. उच्च न्यायालयाने त्यांचे अपील मान्य केले. निलंबनाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना विल्लुपुरम येथील ट्रायल कोर्टात शरण जावे लागेल, असेही त्यात म्हटले आहे.

    2016 मध्ये सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केली.

    2016 मध्ये सत्र न्यायालयाने के पोनमुडी आणि त्यांच्या पत्नीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती. 19 डिसेंबर रोजी न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द केला आणि दोघांनाही दोषी ठरवले. त्यानंतर आठवड्याच्या शेवटी शिक्षेची घोषणा केली जाईल, असे न्यायालयाने सांगितले.

    2002 मध्ये गुन्हा दाखल झाला

    2002 मध्ये, दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाने (DVAC) के पोनमुडी आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी राज्यात AIADMK सरकार होते, DVAC ने दावा केला की के पोनमुडी यांनी 1996-2001 या काळात राज्य सरकारमध्ये मंत्री पदावर असताना बेकायदेशीर मालमत्ता हडप केली होती.

    Tamil Nadu minister sentenced to 3 years imprisonment along with wife

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र