विशेष प्रतिनिधी
मुंबई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम. के. स्टालिन मुंबईत राहुल गांधींबरोबर INDI आघाडीच्या व्यासपीठावर बसले. त्यांनी इंग्रजीतून भाषण केले. नेत्यांबरोबर फोटोसेशन केले आणि नंतर लगेच निघून गेले. असे आज राहुल गांधींच्या भारत जोडो न्यायात्रेच्या समाप्तीच्या दिवशी घडले. Tamil Nadu Chief Minister Stalin came to the platform of INDI Aghadi in Mumbai
INDI आघाडीच्या व्यासपीठावरच्या सगळ्या नेत्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाची स्तुती केली. राहुल गांधींनी आपल्या शेजारी उद्धव ठाकरेंना बसवून घेतले होते, तर मल्लिकार्जुन खर्गे यांच्या शेजारी शरद पवार बसले होते. सभा राहुल गांधींच्या काँग्रेसची आणि गर्दी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अशी शिवाजी पार्कवर अवस्था होती!!
सभेच्या सुरुवातीला डॉ. फारुख अब्दुल्ला दिल्लीचे मंत्री सुभाष भारद्वाज एम. के. स्टालिन या नेत्यांनी भाषणे करून घेतली. पण त्यांच्या भाषणांनी श्रोत्यांमध्ये फारसा जोश भरू शकला नाही. सगळ्यांनी मोदी सरकारच्या विजयासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनलाच दोष दिला. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा खेळ 5 – 10 % चा असतो. तुम्ही मतदानाची टक्केवारी वाढवा म्हणजे मोदी हरतील, अशी मखलाशी भारद्वाज यांनी केली. फारूक अब्दुल्लांनी तसेच भाषण केले. सगळ्या नेत्यांनी 2 – 5 मिनिटांमध्ये भाषणे उरकली.
स्टालिनसाठी फोटोसेशन लवकर उरकले
एम. के. स्टालिन यांना ताबडतोब निघून तामिळनाडू गाठायचे होते, त्यामुळे 2 – 5 दोन मिनिटात ते भाषण उरकून ते निघायच्या बेतात आले होते. त्यावेळी सगळ्या नेत्यांचे फोटोसेशन राहिले आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या संयोजकांच्या लक्षात आले. स्टालिन निघून गेल्यावर फोटोसेशन झाले, तर ते फोटोत येणार नाहीत आणि INDI आघाडी अधिकच आकुंचन पावलेली दिसेल, याची भीती काँग्रेसच्या नेत्यांना वाटली. त्यामुळे बाकीच्या नेत्यांची भाषणे मध्येच थांबून INDI आघाडीच्या नेत्यांचे हात उंचावून फोटोसेशन उरकण्यात आले. त्यामध्ये एम. के. स्टालिन येऊ शकले. फोटोसेशन संपल्याबरोबर स्टालिन व्यासपीठावरून निघून गेले.
Tamil Nadu Chief Minister Stalin came to the platform of INDI Aghadi in Mumbai
महत्वाच्या बातम्या
- DRPPL : धारावी पुनर्विकास सर्वेक्षण सुरू होण्याच्या आदल्या दिवशी राहुल गांधींची धारावीत जाऊन अदानींविरुद्ध चिथावणी!!
- भारताने UN मध्ये ‘इस्लामफोबिया’च्या ठरावावर मतदानापासून राखले अंतर
- आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि ओडिशामध्ये १९ एप्रिलपासून विधानसभा निवडणुका
- निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…