विशेष प्रतिनिधी
चेन्नई : तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून द्रमुक आघाडीने 234 पैकी 159 जागा जिंकून स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. Tamil nadu Assembly Election 2021 Result
त्यामुळे माजी मुख्यमंत्री दिवंगत करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 10 वर्षानंतर राज्यात द्रमुक आघाडी सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. द्रमुकने स्वबळावर 125 जागा जिंकल्या आहेत. बहुमतासाठी 118 जागांची गरज आहे. त्यामुळे आघाडीतील घटक पक्षांची गरज द्रमुकला आता भासणार नाही.
निवडणुकीची मतमोजणी सुरु होताच कल हे द्रमुक विजयी होणार असे दाखवत होते. पहिल्या दोन तासात द्रमुक आघाडी सत्तेवर येणार हे स्पष्ट झाले होते. पाहता पाहता द्रमुक आणि मित्रपक्ष 129 जागांवर तर सत्ताधारी अद्रमुक 98 जागांवर आघाडीवर होते.
राज्यात 234 विधानसभेच्या जागांसाठी 6 एप्रिलला एका टप्प्यात मतदान घेण्यात आले. मतमोजणी पूर्ण होताच द्रमुक आघाडीने 159 जागा जिंकल्या. अद्रमुक आघाडीने 74 जागा जिंकल्या असून एका जागेवर आघाडी घेतली आहे. इतर सर्व पक्षांना निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही.
कमल हासन याचा दारूण पराभव
अभिनेता ते राजकारण असा प्रवास करणारा कमल हासन यांचा निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. त्याचा मक्कल निधी मय्यम या पक्षाने 47 जागा लढविल्या होत्या. कमल हासन याच्यासह सर्वच उमेदवार पराभूत आले आहेत.
Tamil nadu Assembly Election 2021 Result
महत्त्वाच्या बातम्या
- देशात 15 दिवसांचे कडक लॉकडाऊन?, कोविड टास्क फोर्सच्या मागणीवर केंद्र सरकार आज निर्णय घेण्याची शक्यता
- Puducherry Election Results : पुडूचेरीत भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत , 16 जागा जिंकल्या ; काँग्रेस आघाडी 8 तर इतर पक्ष 6 जागावर विजयी
- काळजी करू नका, मी लवकरच भारतात परतेन – आदर पूनावाला यांची माहिती
- निवडणुकीचा निकाल लागला आणि ५३ दिवसांनी ममता बॅनर्जी व्हिलचेअरवरून उतरून चालू लागल्या!
- आदर पूनावालांना धमक्या देणारा मुख्यमंत्री कोण? सोशल मीडियावर संताप