Sunday, 11 May 2025
  • Download App
    तामिळनाडूत वैद्यकीय प्रवेश परीक्षाच रद्द करण्याचे विधेयक मंजूर; आणखी एका विद्यार्थिनीची नापास होण्याच्या भीतीने आत्महत्या । Tamil Nadu approves bill to abolish medical entrance exams; Another student commits suicide for fear of failure

    तामिळनाडूत वैद्यकीय प्रवेश परीक्षाच रद्द करण्याचे विधेयक मंजूर; आणखी एका विद्यार्थिनीची नापास होण्याच्या भीतीने आत्महत्या

    वृत्तसंस्था

    चेन्नई : वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट उत्तीर्ण होणार नाही, या भीतीने तमिळनाडूत एक मजुराच्या मुलीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अशा प्रकारे जीवन संपविणाऱ्या चिमुकल्याची गेल्या चार दिवसातील तिसरी घटना आहे. दरम्यान, वाढत्या आत्महत्यामुळे नीट परीक्षाच रद्द करण्याचे विधेयक मंजूर केले असून त्याचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी राष्ट्रपतींच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. Tamil Nadu approves bill to abolish medical entrance exams; Another student commits suicide for fear of failure

    चार दिवसांत नीटच्या इच्छुकाची ही तिसरी संशयास्पद आत्महत्या आहे आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी २०१७ मध्ये पहिल्यांदाच सामान्य प्रवेश परीक्षा सुरू झाली. तेव्हापासून आतापर्यंत डझनभर मृत्यूंची भर पडली आहे.

    आत्महत्या करणारी १७ वर्षीय मुलगी ही रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराची मुलगी आहे. तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यात ती राहत होती. वैद्यकीय अभ्यासक्रम करण्यासाठी महत्त्वाची असलेली नीट प्रवेश परीक्षा पास करू शकणार नाही, या भीतीने तिने आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.



    नीट परीक्षा रद्द करण्याचे विधेयक मंजूर

    दरम्यान, तामिळनाडूमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदवीपूर्व प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षा (NEET) विरोधात आता आवाज उठू लागले आहेत. आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्या परीक्षाच नको, अशी भावना निर्माण झाली आहे. त्या अंतर्गत राज्य विधानसभेने सोमवारी एक विधेयक मंजूर केले. त्यात NEET परीक्षा रद्द करणे आणि विद्यार्थ्यांना १२ वीच्या परीकक्षेच्या गुणांवर प्रवेश देण्यास अनुमती देणे. या कायद्यासाठी आता राष्ट्रपतींची मंजुरी आवश्यक आहे.

    द्रविड मुनेत्र कळघमचा युक्तीवाद

    आता द्रविड मुनेत्र कळघम (DMK) यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचा असा युक्तिवाद आहे की NEET ग्रामीण आणि गरीब पार्श्वभूमीतील (ज्यांना कोचिंग परवडत नाही) आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ वगळता इतर बोर्डांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होते. (सीबीएसई). त्यामुळे नीट रद्द करून अशा विद्यार्थ्यांना बारावी गुणांवर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जावा. पर्यायाने परीक्षेच्या ताणाखाली जगणारे आणि उत्तीर्ण होणार नाही, या भीतीपोटी कोवळ्या जीवांच्या आत्महत्या टाळतील, असा उदात्त हेतू आहे.

    Tamil Nadu approves bill to abolish medical entrance exams; Another student commits suicide for fear of failure

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार

    Icon News Hub