वृत्तसंस्था
लखनऊ : देशातील सर्वात उंच व्यक्तीने समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. धर्मेंद्र प्रताप सिंह, असे त्या व्यक्तीचे नाव आहे. Tallest person of the country enter in To Samajvadi Party; Welcome from Akhilesh Yadav
यूपी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवण्याची एकही संधी सोडायची नाही. त्या दृष्टीने सर्वच पक्ष प्रयत्न करतात. त्याची प्रचिती नुकतीच आली. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे धर्मेंद्र प्रताप सिंह यांच्यासोबत दिसले. समाजवादी पक्षाने निवेदनात म्हटलं आहे की, आज प्रतापगडचे धर्मेंद्र प्रताप सिंह यांनी पक्षाच्या धोरणांवर आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत समाजवादी पक्षात प्रवेश केला.
उत्तर प्रदेशचे अध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांनी धर्मेंद्र प्रताप सिंह यांना पक्षात समाविष्ट करताना त्यांच्या येण्याने समाजवादी पक्ष मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
कोण आहेत धर्मेंद्र प्रताप सिंह
धर्मेंद्र प्रताप सिंह हे ४६ वर्षांचे असून भारतातील सर्वात उंच व्यक्ती आहेत. त्यांची उंची ८ फूट १ इंच आहे. ते जगातील सर्वात उंच व्यक्तीपेक्षा केवळ ११ सेमी लहान आहेत. धर्मेंद्र प्रताप हे उत्तर प्रदेशातील मेरठचे रहिवासी आहेत.