• Download App
    तालिबानने म्हटले- मंदिरांना आमचा आक्षेप नाही, टीटीपीचा बालेकिल्ला वझिरीस्तानमध्ये बांधणार मंदिर; येथे राहतात 60 हिंदू कुटुंबे|Taliban said - we have no objection to temples, TTP will build a temple in Waziristan; 60 Hindu families live here

    तालिबानने म्हटले- मंदिरांना आमचा आक्षेप नाही, टीटीपीचा बालेकिल्ला वझिरीस्तानमध्ये बांधणार मंदिर; येथे राहतात 60 हिंदू कुटुंबे

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : अफगाणिस्तान सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानच्या उत्तर वझिरीस्तानमधील मीरानशाह येथे राहणाऱ्या 60 हिंदू कुटुंबांसाठी मंदिर बांधले जाणार आहे. हा भाग पाकिस्तान लष्कर आणि सरकारला जेरीस आणणाऱ्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेचा बालेकिल्ला आहे.Taliban said – we have no objection to temples, TTP will build a temple in Waziristan; 60 Hindu families live here

    पाक लष्कर येथे 10 वर्षांपासून प्रतिबंधित टीटीपीसोबत संघर्ष करत आहे. मिरानशाहमधील टीटीपीच्या समांतर सरकारलाही मंदिर बांधण्यास हरकत नाही. उत्तर वझिरीस्तानचे खासदार मोहसिन दावर म्हणाले की, मंदिरासाठी जमिनीची निवड करण्यात आली आहे. मंदिराच्या उभारणीसाठी लवकरच अर्थसंकल्पातही तरतूद केली जाणार आहे.



    टीटीपीच्या नेतृत्वाखाली हिंदूंची काळजी

    माध्यमांशी बोलताना एका तालिबानी कमांडरने म्हटले की, हिंदू कुटुंबांच्या रक्षणाची आणि त्यांच्या श्रद्धांची काळजी घेतली जात आहे. ‘आम्ही पंचायतीमध्ये अर्ज करतो, तालिबानही समस्या सोडवतात. टीटीपीच्या प्रभावामुळे येथे हिंदूंना कधीही त्रास झाला नाही.

    त्यांनी सांगितले की तालिबानी पंचायतीमध्ये आम्ही आमच्या समस्या टीटीपीच्या कमांडरसमोर मांडतो आणि त्यांचे निराकरण केले जाते. इतर राज्यांत हिंदू कुटुंबांवर हल्ले आणि मंदिरांची तोडफोड अशा घटना घडूनही वझिरीस्तानमध्ये असे घडत नाही.

    पंजाब-सिंधची स्थिती; 3 वर्षांत 12 मंदिरांवर हल्ले

    पाकिस्तानातील सिंध आणि पंजाब प्रांतात तीन वर्षांत 12 मंदिरांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये पंजाबमधील रावळपिंडी येथील 100 वर्षे जुन्या मंदिरावरील हल्ला, तर सिंधमधील नगरपारकरमधील श्रीराम मंदिरावरील हल्ल्याचा समावेश आहे.

    Taliban said – we have no objection to temples, TTP will build a temple in Waziristan; 60 Hindu families live here

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!