वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अफगाणिस्तानात तालिबानी हुकुमाने एका झटक्यात सरशी महिलांचे विद्यापीठीय शिक्षण बंद करून टाकले आहे. या घटनेचा संपूर्ण जगभरातून निषेध करण्यात येत असला तरी भारतातले बॉलिवूड स्टार्स आणि लिबरल्स मात्र या विषयावर गप्प आहेत. Taliban rule in Afghanistan; Women’s university education closed
अफगाणिस्तानातील हजारो महिलांनी 3 महिन्यांपूर्वीच विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा दिल्या होत्या. परंतु तालिबाने जारी केलेल्या हुकूमानंतर महिलांचे विद्यापीठ शिक्षणच बंद झाल्याने लाखो अफगाण महिलांचे शैक्षणिक आणि सामाजिक भवितव्य धोक्यात आले आहे.
तालिबानने महिलांवर लादलेल्या शिक्षण बंदीच्या निर्णयाचा अमेरिकेसह युरोपातील देशांनी निषेध केला आहे. त्याचबरोबर भारतात राहत असलेल्या अफगाण नागरिकांनी आणि निर्वासितांनी देखील विरोध केला आहे. परंतु भारतात धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाने टाहो फोडणाऱ्या लिबरल्सनी मात्र अफगाणिस्तानातल्या महिला शिक्षण बंदी वर मूग गिळून गप्प राहणे पसंत केले आहे. भारतातले लिबरल्स सध्या शाहरुख खानच्या पठाण सिनेमावरच्या संभाव्य बहिष्काराची चिंता करत आहेत. पण तालिबाने महिला शिक्षणावर घातलेल्या बंदीवर त्यांनी अद्याप चकार शब्द काढलेला नाही. नसरुद्दीन शहा, स्वरा भास्कर, प्रकाश राज, आमिर खान किरण राव या बॉलिवूडच्या सिताऱ्यांनी आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सामील झालेले अमोल पालेकर, मेधा पाटकर, आनंद पटवर्धन, जावेद अख्तर या लिबरल विचारवंतांनी अद्याप तालिबानी सरकारचा निषेध करणारे एकही ट्विट केलेले नाही.
तालिबानने अफगाणिस्तानमध्ये महिलांविरोधात कठोर आदेश जारी केले आहेत. अफगाणमधील महिलांसाठीचे विद्यापीठ बंद करण्याची घोषणा तालिबानी सरकारने केली आहे. तालिबानच्या नव्या आदेशानंतर कोणत्याही मुलीला किंवा महिलेला विद्यापीठात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे तालिबानी सरकारच्या निर्णयाचा जगभरातून निषेध केला जात आहे.
उच्च शिक्षण मंत्र्यांच्या एका पत्रानुसार, अफगाणिस्तानमध्ये मुली आणि महिलांना विद्यापीठात प्रवेश देण्यात येणार नाही. उच्च शिक्षण मंत्री मोहम्मज नदीम यांचे हस्ताक्षरदेखील या पत्रावर आहे. या पत्रात पुढील आदेशापर्यंत महिलांचे शिक्षण थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लाखो मुलींचे भविष्य धोक्यात
3 महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानातील हजारो मुली आणि महिलांनी विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेश परीक्षा दिली होती. त्यानंतर हा आदेश देण्यात आला आहे. या नव्या आदेशामुळे अफगाणिस्तानातील लाखो मुलींचे भविष्य धोक्यात आले आहे. याआधी देखील तालिबानने जेव्हा अफगाणिस्तानवर कब्जा केला. त्यावेळी महिलांच्या शिक्षणाबद्दल आदेश जारी केला होता. या आदेशात पुरुषांच्या महाविद्यालयात महिलांना शिक्षण घेता येणार नाही. तसेच, मुलींना शिकवणारे सर्व शिक्षक या महिलाच पाहिजे.
जीममध्ये जाण्यासही बंदी
तालिबानने अफगाणिस्तानमध्ये महिलांना जीममध्ये जाण्यास बंदी केली. एक वर्षांपूर्वी तालिबानने अफगाणिस्तानातील सत्ता हाती घेतल्यापासून महिलांच्या हक्कांवर आणि स्वातंत्र्यावर गदा आणली आहे. तालिबानच्या या आदेशाचा अनेक महिलांनी विरोध केला आहे.
Taliban rule in Afghanistan; Women’s university education closed
महत्वाच्या बातम्या
- आदित्य ठाकरेंना ओळखत नसल्याचा रिया चक्रवर्तीचा वकिलामार्फत पुन्हा खुलासा
- रिया चक्रवर्तीला ए. यू. अर्थात आदित्य ठाकरेंचे 44 फोन कॉल; खासदार राहुल शेवाळेंचा लोकसभेत गंभीर आरोप
- चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रचंड उद्रेक, पण भारतात स्थिती नियंत्रणात; डॉ. रणदीप गुलेरियांचा विश्वास
- महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस – राष्ट्रवादी हरलेत, तर महापालिका, झेडपी निवडणुकांमध्ये काय होईल??